32.9 C
Pune
Monday, March 23, 2026
Homeठळक बातम्या*गोवा राज्याचे लोकायुक्तांनी केली औशाच्या शेतरस्ते कामाची पाहणी*

*गोवा राज्याचे लोकायुक्तांनी केली औशाच्या शेतरस्ते कामाची पाहणी*

औसा – गोवा राज्याचे लोकायुक्त तथा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांनी (दि. ३) सप्टेंबर रोजी नागरसोगा ता.औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत काम करण्यात आलेल्या शेतरस्त्याची तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत काम करण्यात आलेल्या जनावरांसाठी गोठा, सिंचन विहीर, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, जीवामृत निर्मिती प्रकल्प, त्यातून फुललेली सेंद्रिय फळबाग व सेंद्रिय भाजीमळा इत्यादी कामांची पाहणी आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत शेतीच्या बांधावर जावून केली.

          या पाहाणी दौऱ्यात अंबादास जोशी यांनी नागरसोगा ग्रामपंचायतीला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तसेच कृषी क्षेत्राचा त्यांचा अभ्यास असल्याने अनेक मोलाच्या सूचनाही दिल्या.तसेच मालनबाई राऊत यांच्या सेंद्रिय शेती, दिलीप सुर्यवंशी यांचे शेततळे व दत्ता पाटील यांच्या मनरेगातून बांधण्यात आलेल्या जनावरांच्या गोठा याची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच येथील शेतरस्ता कामाचे मजबुतीकरण व मातीकाम ,मनरेगा अंतर्गत सलग पडीक बांधावर , रस्त्याच्याकडेला वृक्ष लागवड, बांधावर वृक्ष लागवड, सिंचन विहिरी,शेत रस्ते मजबुती,पेव्हर ब्लाक , गोठा,शेततळे,सिमेंट रस्ता, आदींची थेट बांधावर जाऊन पाहााणी केली. आणि या कामाचे समाधान व्यक्त केले.

           याप्रसंगी शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवड करावा जेणेकरून औसा तालुक्याची ओळख केशर आंबा उत्पादन करणारा तालुका म्हणून ओळखला जावा. औसा विधानसभा मतदारसंघात सर्व योजना यशस्वी होत असून मतदारसंघात २२७० किलोमीटर शेत रस्ते पूर्ण करण्याचा व त्यासोबत डांबरीकरण करण्याचे मानस आहे. माझा सर्व आमदार निधी शेतकऱ्यांसाठी समर्पित केला आहे. असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले. यावेळी दिलीप सुर्यवंशी, बालाजी सुर्यवंशी, सुर्यवंशी सदानंद, अनंतसिग चौहान, दत्ता सुर्यवंशी, संभाजी राऊत, अमृत राऊत आदीसह शेतकरी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]