निलंगा तालुक्यातील निटूर येथील जि.प.प्रशाला आणि जि.प.कन्या प्रशालेत वाचनाची गोडी वाढविण्यासाठी ‘ ग्रंथालय आपल्या दारी ‘ हा उपक्रम संपन्न..
निलंगा-( प्रतिनिधी )- निलंगा तालुक्यातील निटूर येथील जि.प.प्रशाला आणि जि.प.कन्या प्रशालेत वाचनाची गोडी वाढविण्यासाठी ‘ ग्रंथालय आपल्या दारी ‘ हा उपक्रम यशोदीप सार्व.वाचनालय,निटूर आणि इंदिरा सार्व.वाचनालय,मलरडवाडी ( निटूर ) यांनी या उपक्रमांतर्गत या दोन्ही प्रशालेत ७५ विद्यार्थ्यांना मोफत सभासद करून घेण्यात आले असून,त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना बालवयातच आवडेल ते पुस्तक वाचनाची संधी प्राप्त झाली.

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी,तसेच बालवयातच त्यांना पुस्तके वाचण्याची संधी उपलब्ध व्हावी,म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा ग्रंथालय कार्यालय यांच्या समन्वयाने ‘ ग्रंथालय आपल्या दारी ‘ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.उपक्रमांतर्गत निटूर येथील दोन प्रशालेत विद्यार्थ्यांना मोफत सभासद करून घेण्यात येत आहे.निटूर येथे दोन ग्रंथालय असून,उपक्रमाच्या सुरूवातीलाच त्यांनी ७५ विद्यार्थ्यांना मोफत सभासद करून घेतले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आवडेल त्या ग्रंथाचे वाचन करा..विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण झाली तर ते नियमित ग्रंथालयात येतील आणि हवे ते पुस्तक घेऊन वाचन करतील,यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.विद्यार्थ्यांना आवडेल ते ग्रंथ घेऊन वाचन करावे,असे आवाहनही ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

निटूर येथील जि.प.प्रशाला आणि जि.प.कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वाचन करता यावीत यासाठी ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले.यावेळी शिक्षक रोळे आ.जी.,सोनटक्के व्ही.एस.जगताप तानाजी,वाघमारे मोहन,घुमनवाड सुरेश,चवरे आर.सी.,करंणवाघ सर,नागभुजंगे उत्तम तसेच गिरी सर,कोरे सर,सुर्यवंशी मॅडम,यशोदीप सार्व.वाचनालय व इंदिरा सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.काळे,एस.एस.काळे,ग्रंथपाल शिवराज स्वामी,ग्रंथपाल प्रशांत साळुंके,बाळकृृष्ण डांगे,प्रविण नाईक आदी जण उपस्थित होते.हा उपक्रम राबविला जात असल्याने वाचनाची गोडी निर्माण होणार आहे.




