श्रीमद देवी भागवत कथा सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन
यंदा नामवंत कीर्तनकार यांच्या उपस्थितीत सप्ताह गाजणार
निलंगा-(प्रशांत साळुंके)-निलंगा तालुक्यातील निटूर येथे ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह,श्रीमद देवी भागवत कथा सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने दि.18 रोजी गावातील भाविक-भक्तांच्या उपस्थितीत नारळ वाढवण्यात आले. दि.25 एप्रिल 2023 ते 2 मे 2023 पर्यंत गुरूवर्य ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख पंठरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कृृृपाशिर्वादाने व ह.भ.प.विश्वनाथ महाराज मळगे यांच्या अध्यक्षतेखाली सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच,रविवार दि.30 एप्रिल 2023 रोजी मोरया क्रिटीकेअर हाॅस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिबीरास जास्तात जास्त संख्येने शिबीराचे लाभ घ्यावा असेही आवाहन निटूरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सप्ताहातील श्रीमद देवी भागवत कथाकार-ह.भ.प.श्री भालचंद्र लक्ष्मीकांत देव केजकर तसेच दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे 3 ते 6 काकडा,सकाळी 6 ते 7 विष्णुसहस्ञनाम,7 ते 10 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,10 ते 11 गाथा भजन,दुपारी 2 ते 5 श्रीमद्र देवी भागवत कथा सायं.5 ते 6 हरीपाठ,राञी 9 ते 11 हरिकिर्तन,राञी 11 ते 3 हरिजागर होणार आहे.
किर्तनकार दि.25 ह.भ.प.श्री भालचंद्र लक्ष्मीकांत केजकर,दि.26 ह.भ.प.श्री दत्ता महाराज तांदुळवाडीकर,दि.27 ह.भ.प.श्री पुंडलिक महाराज देहूकर,दि.28 ह.भ.प.श्री पांडूरंग महाराज साळुंके पलूसकर,दि.29 ह.भ.प.जगन्नाथ महाराज देशमुख पंठरपूरकर,दि.30 ह.भ.प.बाळकृृृष्ण दादा,वसंतगडकर दि.1 ह.भ.प.गुरूवर्य चंद्रशेखर महाराज,देगलूरकर,दि.2 ह.भ.प.केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी 10 ते 1 पर्यंत होईल.त्यानंतर काल्याचे महाप्रसाद होणार आहे. दि.2 सकाळी 7 वाजता श्री ची पालखी मिरवणूक व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मिरवणूक होईल.त्यानंतर दुपारी 3 वाजता जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.तरी निटूर व परिसरातील गांवकरी यांनी अखंड हरिनाम सप्ताहास मोठ्या संख्येने भाविक-भक्तांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन समस्त निटूरकर यांनी केले आहे.