जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मसलगा पाटीवरील कामकाज अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांना लेखी आश्वासन सादर…
तुळशीदास साळुंके यांचे मसलगा गांवकर्यांनी मानले विकासात्मक आभार…
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } मार्गाच्या मसलगा पाटीवरील पुलाचे काम सदरील शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने निकृृष्ट दर्जाचे केले असता सदरील काम अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके आणि मसलगा नागरिकांनी हे काम बंद पाडून आंदोलन केले असता.या आंदोलनाची दखल घेत नव्याने काम करून देण्याचे आश्वासन लेखीस्वरूपात मसलगा आँन द स्पाॅट संबंधितांनी दिले आहे.
सदर जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील मसलगा पाटीवरील हायवे लगत गावात आवक-जावक पुलाचे काम निकृृष्ट दर्जाचे केले होते.तसेच,पुलावर जुने सिमेंट पाईप घालून काम पूर्णत्वास झाले.हे काम नियमबाह्य असल्याचे निदर्शनास आल्याने पूर्णपणे पुलाचे नव्याने काम करून द्यावे तसेच,मसलगा पाटीवर प्रवाशांना बसथांब्यासाठी बस थांबा,गावात जाणारा 60 मिटर डांबरी रस्ता,गावाच्या नावाचे फलक बसवून देण्याची हमी दिली असून नव्याने काम तात्काळ करून देऊ असे लेखी आश्वासन शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे अभियंता विकास गाढवे यांनी प्रस्तुत माहिती सांगितली आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी दि.25 रोजी सदरील निकृष्ट कामावर कार्यकर्त्यांसह मोठे आंदोलन केले होते.तसेच,संबंधित हायवे कंपनाने नव्याने काम पूर्ण नाही करून दिले तर जेसीबीने जहिराबाद-लातूर रस्ता उखडून टाकू अशी तंबी दिली होती.याची दखल घेत दि.27 डिसेंबर रोजी हायवे कंपनीने संपूर्ण कामे कमी झाले आहेत ते पूर्ण करून देऊ असे लेखी आश्वासन छावा संघटनेला लेखी स्वरूपात दिले आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या या आंदोलनाला यश आले असून हायवे कंपनीने लेखी हमी दिल्यानंतर सेनेचे ईश्वर पाटील,सरपंच रमेश पाटील व मसलगा ग्रामस्थांनी तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांचे आभार मानले आहे.











