भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चद्रकांतदादा पाटील यांचा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )- भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या लातूरच्या निवासस्थानी यथोचित सत्कार करण्यात आला आहे.तसेच,अतिवृृृृष्टी आणि पुरपरिस्थितीमुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाल्याने 72 तासाचे अन्नत्याग आंदोलनात 127 शेतकर्यांच्या समावेत माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केलेल्या आंदोलनाची स्तुती केली.भेटी दरम्यान विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांंच्यासमावेत अतिशय दिलखुलास स्वभावाच्या दादांचे घरी आगमन झाल्याने मनस्वी आनंद झाला. कामाच्या गडबडीत काही निवांत क्षण व अनौपचारिक गप्पा झाल्याचे माजी पालकमंञी तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.
यावेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड,आ.अभिमन्यू पवार, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, किसान मोर्चा प्रदेश सचिव दिलीपराव देशमुख , जिल्हा सरचिटणीस किरण उटगे आदींची उपस्थिती होती.