*चोर्याचे प्रमाण वाढले*

0
222

जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील निटूर येथे चोर्‍यांचे प्रमाण वाढले ; पोलीस यंञणेकडून लक्ष घालण्याची आवश्यकता…

निटूर व्यापारी महासंघ आणि नागरिकाची मागणी..

निलंगा,-(प्रशांत साळुंके)-जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक { 752 } मार्गावरील निटूर गावाची लोकसंख्या पंधरा हजाराच्या घरात असताना मागील एक महिन्यापासून चोरीचे सञ चालू आहे.माञ,याकडे संबंधितांचे दूर्लक्ष होताना पहावयास मिळत आहे.गावात राञी पोलीस यंञणेकडून पेट्रोलिंगची आवश्यकता आहे. निलंगा तालुक्यातील निटूर येथे गेल्या एक महिन्यापासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे.कालच्या मध्यराञी बुधवारी राष्ट्रीय महामार्गावरील बसथांबाकालगतच्या तीन पान-स्टाॅल टपर्‍याचे कूलुप तोडून साहित्य आणि रक्कम चोरी केले आहे.त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


गेल्या आठवड्यात निटूरमोड येथील चौकातील सहा पानस्टाॅल चोरट्यांनी फोडून साहित्य आणि रक्कम चोरली होती.निटूर येथील बाजार चौकातील जगदंबा मंदिराची दानपेटी फोडून रक्कम चौरली होती.जगदंबा मंदिराजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडले होते.माञ,चोरट्याला कांहीच हाती लागले नव्हते.यामुळे बाजार चौक,बसस्थानक,निटूरमोड चौक येथे भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीसांनी कार्यवाही करावी गस्त घालावी,अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे.तसेच,जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील निटूर येथील आवक-जावक करणार्‍या वाहतुकीला रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा निर्माण होताना दिसत आहे.याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here