माजी मुख्यमंञी तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे निलगा तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीनुसार शेतकर्यांची सरसकटभरपाई देण्याची मागणी..
निलंगा,-( प्रशांत साळुंके )-अतिवृृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या शेतकर्यांच्या नुकसान भरपाईसाठी अनेक गावातील बांधावर जाऊन पाहणी करणारा कणखर नेते माजी मुख्यमंञी तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांना अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी मसलगा येथे अतिवृष्टी व पूरपरिस्थितीची पाहणी दरम्यान निवेदन दिले.
निवेदनामध्ये मसलगा मध्यम प्रकल्प व मांजरा नदीमुळे मसलगा सोळ नदीकाठची शेतजमीन कायम बाधीत होते, त्यामुळे कायम बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करा व सर्व अतिवृष्टीग्रस्त व पुरग्रस्त शेतकर्यांना सरसकट ५० हजाराची मदत करावी असे निवेदनात मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गुरुनाथ जाधव, बाबासाहेब पाटील, सतीष जाधव, ज्ञानेश्वर पिंड, प्रकाश जाधव, दिलीप जाधव, बालाजी पिंड, सुनिल पाटील, दिपक पिंड, दगडू आरेराव, हारीदास साळुंके, प्रल्हाद लोकरे आदी शेतकरी उपस्थित होते.
माजी मुख्यमंञी तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शेतकरी संवाद..

अतिवृृृष्टी आणि पूरपरिस्थितीची पाहणी करण्याकरिता मसलगा येथील महामार्गावरून जात असताना शेतकरी मोठ्यासंख्येने आपली व्यथा आपल्या निवेदनाव्दारे सादर करून फडणवीस यांनी शेतकर्यांशी संवाद साधताना तुम्हाला सर्वांना न्याय देण्यासाठी मी आग्रही आहे काळजी करू नका मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन असेही याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
———————————————————————











