अप्रतिम अनुभव…!
मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न खरे होऊ पहातायेत. आजही काही समाज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाही. सांगायचं झालं तर पारधी समाज आजही त्यांच्या पिढ्यान् पिढ्या चालत आलेला व्यवसाय करताना आपल्याला दिसते. आणि गावापासून दूर थोड्या अंतरावर त्यांचा बेडा असतो. आज मला लिहायला अतिशय आनंद होत आहे की कोरोना मुळे सगळ्या शाळा बंद आहे. आणि सगळ education online mode वर चालू आहे. अशा परस्थितीमध्ये मी माझ्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रत्यक्षात “उमेद संकल्प मुलांचे वसतिगृह” येथे मुलांसोबत माझा टाइम स्पेंड केला. इथला अनुभव माझ्यासाठी खूप छान आणि चॅलेंजिंग राहला.

ज्या मुलांनी कधी शाळा बघितली नाही. किंवा शाळेत जाण्याची कधी आवड मनामधे निर्माण केली नाही. भीक मागणे, चोरी करणे, दारू काढणे, विकणे, कचरा वेचने, ही कामे आजही मोठ्या प्रमाणात करताना ही मुले आपल्याला दिसून येते. आणि या मुलांचे आई वडील स्वतः आपल्या मुलांना ही कामे करायला सांगतात. अशा वास्तविक परिस्थितीत जगलेली मुले गेल्या पाच वर्षांपासून उमेद संकल्प ला शिकत आहे. इथली काही मुले वयाने मोठी आहेत पण कधी शाळेत गेली नाहीत. अशा मुलांना शिकविणे थोडी तारेवरची कसरतच आहे. कारण ABCD सुद्धा काही मोठ्या मुलांना ओळख नाही. त्यात शाळा बंद. अशावेळी मुलांच्या आवडी-निवडी वेगळ्या असणे ही बाब जरी स्वाभाविक असली तरी, त्यांच्या बौद्धिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक गुणाचा विकास करण्यासाठी इथे वेगवेगळ्या Educationals tools वापराव्या लागतात. यामध्ये वेगवेगळे बौद्धिक पातळी वाढवणारे Games, Activities, स्पर्धा घेणे, मराठी, Math’s, Geography, History, Environment etc. Subjects शिकविणे आणि त्यांच्याबरोबर आपणही शिकणे हा अनुभव खरचं खुप अप्रतिम असा होता. स्वच्छ्ता, आरोग्य, वाचन, गाप्पा-गोष्टी, enjoyment आणि दैनंदिन अभ्यासक्रम म्हणजेच मुलांची अगदी ११ ते ५ असा school टाईमच ठरला होता. मुलांना शिकविणे, शिकणे, रागावणे, कौतुक करणे, हे सगळ अनुभवताना मला मनात वाटायचं मी शाळेची profesional teacher च बनली. आणि ही संधी मला उमेद संकल्प ने दिली. त्याबरोबरच मुलांच्या बेड्यावर जाऊन प्रत्यक्षात भेटी देणे. त्यांच्या आई वडिलांशी बोलणे, तिथली वास्तविक परिस्थिती डोळ्याने बघणे, त्यांची मुल शाळेत न पाठवण्याचे कारण जाणून घेणे. आणि शिकवताना मुलांना त्यांच्या जीवन जागण्याची शैली आणि शिक्षणाचे महत्व या मुलांचे भविष्य कसे बदलू शकते यावर त्यांच्या सोबत चर्चा केली.
अशा पारधी तसेच अनेक भटक्या जमातीतील आणि गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये उमेद संकल्प रोठा, वर्धा येथे मंगेशी मून या काम करत आहे.
Special thanks to Mangeshi Moon, Hrutvi moon, Nalanda Academy Wardha, Minakshi Jivane, Manisha tai, Usha Matre, Suknya Valke, Priti Atey, Pranali Moon, Tarachand Matre, Manish Pusate,
Pranali Dhabarde ✍️











