36.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्याजनगणनेमध्ये बौद्धांनी जात नमूद करु नये -आंबेडकर

जनगणनेमध्ये बौद्धांनी जात नमूद करु नये -आंबेडकर

जातीनिहाय जनगणनेमध्ये बौध्दांनी जात नमूद करू नये

  • भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे आवाहन
    लातूर/प्रतिनिधी

  • बौद्धांनी जातीनिहाय जनगणनेत बौद्धांनी जात नमूद करू नये, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जो बौद्ध धम्म देशात पूनर्जिवित केला. त्या धम्मामध्ये जाती नाहीत, म्हणून धम्म स्विकारला आहे. त्यामुळे धम्मात जाती आणण्याचे काम आमच्या हातून होवू नयेत. त्यामुळे जाती टाकून दिलेल्या आहेत. पुन्हा जनगणनेत जात लिहिण्याचे काम करू नये. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी आज २ मार्च रोजी लातूर येथील पत्रकार परिषदेत केले आहे.

  • किल्लारी येथे भंते धम्मसार यांच्या नेतृत्वात अ. भा. धम्म परिषद आयोजित केलेली आहे. त्यानिमित्ताने राजरत्न आंबेडकर हे लातूर दौर्‍यावर आले आहेत. त्यानिमित्त लातूर शहरातील गांधी चौक येथील रसिका हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राज्य कार्याध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव धबडगे, मराठवाडा महासचिव प्रा. किशोर चक्रे, ठाणे जिल्हाध्यख रविंद्र गुज्जर, लातूर जिल्हाध्यक्ष कुमार सोनकांबळे, महासभेचे सदस्य मोहन माने, आरपीआयचे अशोक कांबळे, बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष महादेव वाघमारे, महासचिव रविकांत सिरसाट, प्रा. अनंत लांडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    धर्मांंतर विरोधी कायदे देशात हेात आहे. गुजरात व यूपीमध्ये कायदा झाला आहे. या कायद्यांचा विरोध संपूर्ण देशात व्हायला पाहिजे. हा देश हिंदुराष्ट्र संकल्पनेकडे वळत चालला आहे. आजचे सत्ताधार्‍यांना वर्णव्यवस्थेवर आधारीत देश निर्माण करायचा आहे. सत्ताधार्‍यांना हिंदूराष्ट्र करायचे नाही. धार्मिक अल्पसंख्यांक व हिंदूनी एकत्र येवून भारतीय म्हणून धर्मनिरपेक्षता टिकवावी लागेल. हिंदूबद्दल त्यांना प्रेम असते तर आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान केला नसता. आरएसएस व भाजपवाल्यांना हिंदूबद्दल काहीएक देणे घेणे नाही. युक्रेनमध्ये २० हजार हिंदू विद्यार्थी अडकलेत आणि आपली भारतीय पंतप्रधान काहीच करीत नाहीत. असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.
  • तसेच मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र संसदेत खाजगीकरणाच्या बिलाला विरोध केला असता तर छत्रपती संभाजीराजेंना रस्त्यावर उपोषण करण्याची वेळच आली नसती. केंद्र सरकार सगळ्याच सार्वजनिक क्षेत्राचे, कंपन्यांचे खाजगीकरण करीत आहे. आणि खाजगी क्षेत्रात आरक्षण नसणार आहे. आरक्षण मिळून काय फायदा, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
    यावेळी भगवान इसाळे, विजय श्रृंगारे. सतिश मस्के, सुरेंद्र कांबळे, राजू कांबळे, अरविंद दामावले, बालाजी उबाळे, विजय मस्के, धम्मानंद गायकवाडद्व कमलाकर इंगळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]