Table of Contents
आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
लातूर : खुर्दळी (हाळी खुर्द, ता.चाकूर) येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या नवसाला पावणाऱ्या श्री.जनमाता आई देवस्थान मंदिरातील घटस्थापनेचा कार्यक्रम शनिवारी (दि.१४) अमावास्या रोजी विवेक बंडोपंत शास्त्री यांनी केलेल्या मंत्रोच्चारात संपन्न झाला. पालखी मिरवणूक व जल यात्रा चंद्रकांत साळुंके यांच्या निवास्थानापासून काढण्यात आली.
हा कार्यक्रम प्रथा, परंपरा व रीतिरिवाजानुसार पालखी मिरवणूक, जल यात्रा, आराधी, वाजंत्री यांच्या गजरात आमदार बाबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, सौ.दीपाली कदम, चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पर्जन्यवृष्टी, शेतकऱ्यांच्या सुख – समृद्धीसाठी आराध्यांनी गोधळाच्या माध्यमातून देवीला साकडे घातले. यावेळी गावकरी, भक्तमंडळी, आराधी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवर
आमदार बाबासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, सौ.दीपाली कदम, चेअरमन डॉ.गोविंदराव माकणे, दयानंद सुरवसे, अनिल वाडकर, युवा नेते सागरभैया होळदांडगे, शिवाजी रामपूरकर, पोलीस पाटील साहेबराव पाटील, सरपंच सौ.प्रचिता भोसले, चेअरमन जलील पटेल, माजी सरपंच अशोकराव कर्डीले, आबा महाराज, ह.भ.प.मोहन महाराज, बालाजी चामले, उद्योजक संगमेश्वर लाटे, यशवंत जाधव, माध्यम प्रतिनिधी चेतन होळदांडगे, दीपक पाटील, किशनराव वडारे, सुनिल जाधव, सतीश चंदे, सुमित ढोबळे

अन्नछत्र
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या जनमाता देवी मंदिरात नवरात्रौत्सवात दररोज तर वर्षभर प्रत्येक मंगळवारी अन्नछत्र (महाप्रसाद) भाविक भक्तांमार्फत मंदिर समितीच्या सहकार्याने चालवला जातो.
मंदिराच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही
– आमदार बाबासाहेब पाटील
मंदीर व गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या काळात अल्पसंख्यांक योजनेतून मुस्लीम समाजासाठी ही निधी देण्यात येणार आहे असे प्रतिपदन स्थानिक विकास आमदार निधी अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या सभागृह भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले.




