जलसमृद्ध औसा अभियानाला लोकसहभाग मिळाल्यास अभियान देशाला दिशादर्शक ठरेल
– पद्मश्री पोपटराव पवार
औसा ( माध्यम वृत्तसेवा)- शेतरस्तेसंदर्भात आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. शेतरस्ते सारखे अवघड काम त्यांनी यशस्वीपणे मतदारसंघात करून दाखवले आता पाण्यावर काम करण्याची तयारी सुरू केली आहे गेल्या पंचवीस वर्षांत आपण जो पाण्याचा उपसा केला आहे. तो भरून नाही काढला तर आपल्याला दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. ते आशा अभियानातून भरून काढले पाहिजे पाण्यावर काम करणे आव्हानात्मक आहे. पण या कामाला लोकसहभागाची जोड मिळाली तर देशाला दिशादर्शक काम ठरू शकते असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आहे.

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटीव्ह फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने औसा येथे (दि १३) आॅगस्ट रोजी जलसमृद्ध औसा अभियानाचा जनसंकल्प मेळावा आयोजित ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार अभिमन्यू पवार, माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, पोलीस प्राधिकरणचे उमाकांत मिटकर, उद्योजक कौशिक कोठिया, प्रगतशील शेतकरी सीताराम जाधव, माजी कुलगुरू डॉ अशोक ढवण, क्रिएटीव्ह फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार, उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, गटविकास अधिकारी आनंद मिरगळे, सुभाष जाधव, किरण उटगे, सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे, प्रा सुधीर पोतदार,सदाशिव जोगदंड, शिव मुरगे, सुनील उटगे, कल्पना डांगे, धनराज परसने, ऋषाल देशमूख, रवी चिलमे, परमेश्वर धुमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते की राजकारणात संस्कार असलेली माणसे असतील तर त्यांचा समाजाबद्दलचा हेतू सरळ असतो आणि तो आमदार अभिमन्यू पवार यांच्या शेतरस्ते कामातून स्पष्ट दिसतो त्यामुळे त्यांना संस्कार सम्राट आमदार म्हणले पाहिजे. शेतरस्त्यांसारखे किचकट काम त्यांनी करून दाखविले एखाद्या प्रयोगात आपण यशस्वी झालो, तर त्या कामाचं सर्व स्तरांवरून कौतुक होतं. त्याला मानसन्मानही मिळतात, परंतु तो प्रयोग यशस्वी होण्यामागं अनेक लोकांचं सकारात्मक योगदान असतं. त्यानंतरच नावीन्यपूर्ण प्रयोग पूर्णत्वास जातात.असाच सहभाग लोकांचा पाण्याच्या कामात राहिला तर हे कामही सहज होवून जावू शकते हे काम समाजाचे काम आहे. पुढच्या पिढीच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे काम आहे. हिवरेबाजार हे आदर्श गाव लोकसहभागाचा उत्तम नमुना आहे. असे सांगून त्यांनी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा ऊहापोह करीत दिवंगत नेते विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे हे मराठवाड्याचे भविष्य होते त्यांच्या अकाली मृत्यूने मरावाडयाचे मोठे नुकसान झाले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले. यावेळी योगेश्वर उद्योग समुहाच्या वतीने यावेळी २० लाख रुपयांचा धनादेश या कामासाठी सुपुर्द करण्यात आला.
दुष्काळग्रस्त कलंक पुसण्यासाठी
लोकसहभागाची गरज – आ पवार
औसा तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या तालुक्यात झाल्या आहेत. त्यामुळे येथे पाण्यावर काम होणे आवश्यक आहे. आपण आमदार झाल्यानंतर रस्ता, वीज व पाणी यावर काम करण्याचा संकल्प केला त्याचीच सुरुवात म्हणून शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत तेराशे किलोमीटर पेक्षा अधिक लाबींचे शेतरस्ते तयार केले या कामासाठी धोरणात्मक सुधारणा व महसूली अधिनियमात बदल केले. तर शेतकऱ्यांना उच्च दाबाने विद्युत पुरवठा होण्यासाठी मतदारसंघात नवीन ११ वीज उपकेंद्र उभारणीचे काम सुरू केले याचबरोबर रोहित्री क्षमता वाढ करून पुढील पंचवीस वर्षे वीजेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी व्यवस्था तयार करीत आहोतच भविष्यात दुष्काळाची वेळ येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी औसा पाणीदार करण्याच्या दृष्टीने काम करण्याची गरज आहे.यासाठी जलसमृद्ध औसा अभियान हाती घेण्यात आले असून यासाठी लोकसभाची गरज असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.
लोकांचा प्रतिसाद
त्या गावाला अगोदर संधी – अॅड परिक्षीत पवार राजमाता जिजाऊ शाळा माझी न्यारी उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाचे धोरण आखून मतदारसंघातील शाळांमध्ये अद्ययावत सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. याच धर्तीवर आपण जलसमृद्ध औसा अभियान उभे करणार असून हे अविरत दहा वर्ष चालणारे काम आहे. आपण टप्प्या टप्प्यात गावे समाविष्ठ करून या योजनेअंतर्गत कामे पूर्ण करणार आहोत. यावेळी ज्या गावांमध्ये कामाला संधी व लोकांचा सहभाग अधिक दिसेल त्या गावाला पसंती दिली जाईल असे ते म्हणाले.
