जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना लातूर ला करणार पाणीदार, तलावाचे करणार कायापालट.
लातूर: देशातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांना जलसमृद्ध बनविण्यासाठी केंद्र (जल जीवन मिशन, पंचायती राज, जलशक्ती मंत्रालय) व राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने मिशन जलपर्याप्त जिल्हे (Mission Water Sufficient Districts) हा कार्यक्रम राबविला जात आहे.
लातूर जिल्हाअधिकारी कार्यालयामार्फत हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जात असून या मध्ये लातूर मधील जल स्त्रोतांचे पुनर्जीवन होणार आहे. याचा निगडीत केंद्र सरकार व त्याचा शी संबंधित विभागा सोबत करार केले गेले आहेत आणि लातूर मध्ये जिल्हा प्रशासना व भारतीय जैन संघटना लातूर यांचात करार झाले आहेत. या अंतर्गत भारतीय जैन संघटणे कडून जिल्हा पाणीदार होण्यासाठी विविध कार्य केले जाणार आहेत. डिमांड निर्माण करण्यासाठी प्रचार रथाचा वापर केला जाणार आहे व याचा मध्ये मातून प्रचार व प्रशार केला जाणार आहे. निवडलेल्या गावागावांमध्ये जाऊन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकर्यांमध्ये जनजागृती करणारे प्रत्येक तालुक्यात सुसज्ज प्रचार-रथ तयार करण्यात आले आहेत. या अंतर्गत गावातील तलावाचे खोलीकरण करणे, गाळ काढून तो शेतात घेऊन जण्यापर्यंत शेतकऱ्यांचे प्रबोधन व वेळोवेळी मदत करणार आहे. सदरील प्रचार-रथावर सुसज्ज प्रचार साहित्य तसेच कार्यक्रमाचे गाणे, जिंगल, घोषणा आणि संवाद गावांमध्ये जनजागृतीसाठी तयार केले असून हा प्रचार-रथ जिल्ह्यातील गावागावात जाऊन या योजनेत सहभागी होण्यासाठी जनजागृती करणार आहे.

भारतीय जैन संघटना लातूरचे जिल्हा अध्यक्ष अभय शाह, सुनील कोचेटा, डॉ. पी. पी. शहा, किशोर जैन, संतोष उमाटे आणि ज्ञानेश्वर मसके (7447277636) जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, भारतीय जैन संघटना लातूर व जिल्हा प्रशासन लातूर कार्य करत आहेत. आधिक माहिती साठी प्रकल्प व्यवस्थापक यांच्याशी संपर्क करावा.
शेतकाऱ्यामध्ये रथद्वारे जनजागृती केली जाणार-
बीजेएस व केंद्र सरकार बरोबर झालेल्या करार अंतर्गत या अभियानात देशभरातील 100 पर्याप्त जिल्हयामद्धे हा उपक्रम राबावला जात आहे. यात राज्यातील 26 जिल्हयामद्धे लातूर जिल्हाचाही समावेश आहे. गावोगावी प्रचार रथ सज्ज केले जाणार आहेत. निवडलेल्या गावात शेतकार्यामद्धे रथद्वारे जनजागृती करन्याचे काम भारतीय जैन संघटना करणार आहे.
काय होणार फायदा – तलावातील गाळ काढल्याने तलावात पाण्याची साठवण क्षमता वाढेल. पानी जमिनीत मुरल्याने विहिरी रीचार्ज होतील, यासह वन्यजीव प्राण्याना पानी मिळेल. काढलेला गाळ शेतात टाकल्याने उत्तम खत म्हणून पिकाच्या वाढीसाठी महत्वापूर्ण ठरेल.