जवानांसोबत ‘ मनकि बात ‘

0
563

जवाना समवेत आ. रमेशआप्पा कराड ‘मन कि बात’ कार्यक्रमात सहभागी

           लातूर दि.३० – जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते देशाचे सक्षम पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या “मन की बात” या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड हे लातूर येथील केंद्रीय राखीव पोलिस दल या प्रशिक्षण केंद्रात पोलीस जवानासमवेत सहभागी झाले होते.

            पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी 30 जानेवारी 2022 रविवार रोजी सकाळी 11.30 वाजता देशाला मन की बात या कार्यक्रमातून संवाद साधला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील प्रशिक्षण केंद्रावर कोरोनाचे नियम पाळून झालेल्या या मन की बात कार्यक्रमात आ. रमेशआप्पा कराड यांच्यासमवेत प्रशिक्षण केंद्राचे डीआयजीपी संजीवकुमार, कमांडेट राजेशकुमार सिंग, उपकमांडेट रणवीरसिंग, पी. के. घोष, विशाल कोरे, ज्योती शाल, डॉ. निकिता नायडू, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रम शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, अनिल भिसे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, बुथ रचना प्रमुख जिल्हा संयोजक तुकाराम गोरे, अॅड. मनोज कराड, महेंद्र जाधवर, रघुनाथ केंद्रे, जगदीश कुलकर्णी, चंद्रकांत कातळे, सुधाकर गवळी, किरण मुंडे, कैलास पाटील, गोविंद मुंडे, राजाभाऊ जवंडरे, गोविंद नांदे यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी, कर्मचारी जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

         आपल्या अर्ध्या तासाच्या मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी विविध लहान लहान विषयाकडे देशभराची लक्ष केंद्रित केले. सर्वसामान्‍य परिस्थितीतून असामान्‍य कार्य करणाऱ्या मात्र प्रसिध्‍दीपासून दूर असणाऱ्या अनेकांना राष्‍ट्रीय स्‍तरावरील पुरस्‍कारांनी गौरविण्‍यात आले. या पुरस्‍कारातून इतरांना निश्चित प्रेरणा मिळेल.

देशभरातील असंख्‍य देशवासींनी मोदीजींना पोस्‍ट कार्ड पाठवून आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या होत्‍या. त्‍यातील कांही प्रभावित पोस्‍ट कार्डाबद्दल माहिती देवून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, पशु पक्षाचे संवर्धन झाले पाहिजे, भारतीय संस्‍कृतीचे परदेशात आकर्षण असल्‍याने देशातील योगासह उत्‍सव जतन करावे असे आवाहन करून छोटे छोटे उद्योग व्‍यवसाय सुरू करून देशाच्‍या प्रगतीत भर घालण्‍याबरोबरच प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता अभियान आणि भ्रष्टाचार मुक्‍त भारत यावरही त्यांनी भर दिला.

जनतेशी संवाद साधून त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणारे नरेंद्रजी मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत त्यांचे विचार आणि संकल्पना देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाच्या असल्याने प्रत्येकानी त्या दिशेने काम करावे असे कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डीआयजीपी संजीव कुमार आणि तुकाराम गोरे यांनी बोलून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकमांडेट नारायण चामे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here