एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनचा उपक्रम
फिजिओथेरपी उपचाराने अर्धांगवायू लवकर बरा होतो
–डॉ. पल्लवी जाधव
लातूर, दि. 11 – शरीरात हृदयाकडून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या बंद पडल्यास अथवा तुडल्यास मेंदूस झटका येवून ब्रेनस्ट्रोक अर्थात पक्षघात / अर्धांगवायू हा आजार होतो. पक्षघात झाल्यापासून पहिल्या सहा तासात रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. या आजाराच्या रुग्णास औषधोपचार बरोबर फिजिओथेरपी उपचार आवश्यक असून या उपचाराने हालचालीस मदत होऊन रुग्ण् लवकर बरा होतो, असे प्रतिपादन एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयातील न्युरो फिजीओथेरपी विभाग प्रमुख डॉ. पल्लवी जाधव यांनी केले.

लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ फिजीओथेरपी महाविद्यालय व डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पक्षघात दिनानिमित्त जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित जागृतीपर कार्यक्रमात डॉ. पल्लवी जाधव बोलत होत्या. यावेळी डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनचे डॉ. बी. आर. पाटील, डॉ. सलिम शेख, डॉ. रिषा कांबळे, श्री माणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. पल्लवी जाधव म्हणाल्या की, पक्षाघाताचा झटका आल्यास रुग्णास चालताना तोल जाणे, दृष्टी अंधुक अथवा नाहीशी होणे, चेहरा वेडावाकडा होणे, संवेदना नाहिशा होणे, अशक्तपणा येणे, शरीराच्या विशिष्ट भागातील ताकत निघून जाणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे अढळून अल्यास रुग्णास तात्काळ रुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यावेत. अनेकजण पक्षघाताचा झटका आल्यास त्याकडे गाभिर्यांने न पहाता इतर गावठी उपचार घेतात. त्यामुळे पहिल्या सहा तासाचा कालावधी हातातून निघून जातो. त्यानंतर घेतलेल्या उपचारास फारशे यश मिळत नाही. या आजारात जर रुग्णास वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण् पुर्ववत होऊ शकतो. पक्षाघाताच्या रुग्णास आवश्यक औषधोपचार देऊन आजाराची तीव्रता कमी करता येते मात्र या आजाराच्या रुग्णास फिजिओथेरपी उपचार वेळेत दिल्यास त्याचा जास्त फायदा होतो. पक्षाघाताच्या रुग्णाची बाधित बाजू वेगवेगळ्या फिजिओथेरपी उपचार देवून पूर्ववत करता येते. तसेच स्ट्रेचिंग, तोल सांभाळण्याचे, ताकत वाढवण्याचे व्यायाम केल्याने रुग्णांच्या हालचालीस मदत होते, असे डॉ. जाधव यांनी सांगीतले.

यावेळी डॉ. सलिम शेख यांनी पक्षघात आणि फिजीओथेरपी उपचार या विषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. बी. आर. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयातील बॅचलर ऑफ फिजिओथेरपी अंतिम वर्षातील विद्यार्थी निकिता ब्रिजवाशी, प्रांजली चव्हाण, मानवी खत्री, स्नेहल घुले, ऋतुजा अंबुलगेकर, वैष्णवी अरगुलवार, ऋतुजा भोसले, सांची चव्हाण, श्रुती देशमुख यांनी अर्धांवायू या विषयावर जागृती पर पथनाट्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मुंडे यांनी केले तर आभार डॉ. श्रध्दा चांडक यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. साक्षी थोरात, डॉ. कुशल आर्यमन, डॉ. श्रध्दा चांडक, डॉ. स्मिता मुंडे, डॉ. प्रतिक्षा कावळे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन, रोटरी क्लब, लातूर, हास्य क्लब, लातूर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, लातूर यांचे सदस्य आणि एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालयातील डॉक्टर व विद्यार्थी उपस्थित होते.
—————————————————-




