• ” तू म्हणशील तसं ” अभियांत्रिकी विद्यार्थी मदतीसाठी नाटक.
• श्री जानाई प्रतिष्ठानचा सामाजीक उपक्रम
लातूर;ता.२७:
अभियांत्रिकी महाविद्यालयातील गरजू ,हुशार, होतकरू विद्यार्थ्यांच्या प्रवेशशुल्क संकलनास्तव दर वर्षी श्री जानाई प्रतिष्ठान सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते. यावर्षी प्रतिष्ठानने प्रशांत दामले निर्मित, प्रसाद ओक दिग्दर्शित, संकर्षण क-हाडे व भक्ती देसाई यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या ” तू म्हणशील तसं ” ह्या भन्नाट विनोदी नाटकाचे आयोजन केले आहे.
१५ डिसेंबर रोजी सायं ६ वा.मार्केट यार्ड येथील दगडोजीराव देशमुख नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

आज पर्यंत २२ वर्षात २१ सांस्कृतिक कार्यक्रमाचे जानाई परिवाराने आयोजन केले आहे. यातून जे निधी संकलन झाले त्यातून १३० विद्यार्थ्यांनी आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले व ते अभियंते झाले आहेत. या वर्षी ” तू म्हणशील तसं ” या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निधी संकलातून ११ विद्यार्थांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी अर्थसाह्य केले जाणार आहे.

आपली प्रवेशिका आजच आरक्षित करा व गरजू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करा. असे आवाहन श्री जानाई प्रतिष्ठान सास्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डाॅ. वैशाली टेकाले, कार्याध्यक्ष अभि.श्रीकांत हिरेमठ, सचिव प्रा.दत्तात्र्येय मुंढे विद्यार्थी मंडळाचे समर्थ कुलकर्णी, अवधुत कुलकर्णी, डाॅ.ऋजुता अयाचित, डाॅ आरती संदीकर, डाॅ. अभिजीत मुगळीकर, प्रसाद उदगीरकर, राजेश मित्तल, डाॅ विश्वास कुलकर्णी अतुल ठोंबरे यांनी केले आहे.












