विविध विकास निर्देशांकात लातूर जिल्हा प्रथम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सन्मान
मुंबई -दैनिक ‘लोकसत्ता’ने राबविलेल्या ‘जिल्हा निर्देशांक’ या उपक्रमांतर्गत सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशिलाच्या आधारे पुणे येथील विख्यात ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’तर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण कारण्यात आले. यामध्ये लातूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकांबाबत प्रथम क्रमांक नोंदवला आहे. या निर्देशांकाचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. तसेच या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांची प्रमुख उपस्थिती होती.




