जिल्हाभरात जलजीवनच्या माध्यमातून चार हजार कोटीची कामे
चार हजार कोटीची कामे करण्यात आली
पानगाव येथील जाहीर सभेत खा. सुधाकर शृंगारे यांचे प्रतिपादन
लातूर दि.२७ – गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. खासदाराने काय केले काँग्रेसच्या या आरोपाचा समाचार घेत हर घर नल…. नलसे शुद्ध जल….. या एकाच योजनेच्या माध्यमातून जिल्हाभरात अनेक गावागावात तब्बल चार हजार कोटी रुपयांची कामे केली असल्याचे भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांनी पानगाव येथील जाहीर सभेत बोलून दाखविले.

लातूर लोकसभा निवडणुकीतील प्रचारार्थ रेणापूर तालुक्यातील मौजे पानगाव येथे शुक्रवारी सकाळी जाहीर सभा झाली. या सभेतून खा. शृंगारे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक व्यंकटराव मामा हे होते तर याप्रसंगी भाजपाच्या नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड, जिल्हा सरचिटणीस महेंद्र गोडभरले, शिवसेना युवा जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद आंबेकर, सांगायो समिती अध्यक्ष वसंत करमुडे, भाजपाचे सतीश आंबेकर, प्रदीप कुलकर्णी, दिलीप शेंडगे, अनंत चव्हाण, सुकेश भंडारे, श्रीकृष्ण जाधव, सुंदर घुले, डॉ. हेरकर, मारुती गालफाडे, वामन संपत्ते, महिला आघाडीच्या ललिता कांबळे, अनुसया फड, शीला आचार्य, रंजना गालफडे, श्रीमंत नागरगोजे, गणेश तूरूप, अमर चव्हाण, मनोहर पाटील, माधव घुले, सुरेश बुड्डे यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी खा. सुधाकर शृंगारे यांनी केलेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन खासदाराने काय केले काँग्रेसच्या या आरोपाचा खरपूस समाचार घेताना जल जीवन च्या माध्यमातून जिल्ह्यात ४ हजार कोटीची कामे झाली. ३७ हजार घरे बांधली साडेआठ हजार कोटी रुपये खर्चाचे सिमेंट रस्त्याचे जाळे निर्माण झाले, कोरोनाच्या काळात सामान्यांचा जीव वाचवण्यासाठी १२० व्हेंटिलेटर आणले, दिव्यांगांना ५६ ट्रक साहित्याचे वाटप केले, तब्बल ५८४ प्रश्न सभागृहात विचारले अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी नरेंद्रजी मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
डॉ. अर्चनाताई पाटील निलंगेकर म्हणाल्या की, संपूर्ण देशभरातील जनता मोदीजींच्या सोबत असून काँग्रेसकडून अफवा सोडण्याचे अपप्रचार करण्याचे प्रकार होत आहेत अशा खोट्या प्रचारापासून जनतेने सावध राहावे. तुमचा आमचा सर्वांचा सन्मान वाढण्याचे काम करणाऱ्या नरेंद्रजी मोदी साहेब यांना साथ देण्यासाठी सुधाकर शृंगारे यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.

रेणापूर, पानगाव परिसर मुंडे साहेबावर प्रेम करणारा असून या भागात प्रत्येक निवडणुकीत कमळच उगवले असल्याचे सांगून भाजपाचे युवा नेते ऋषिकेश दादा कराड यांनी लोकसभेची निवडणूक देशाच्या प्रश्नासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून ७० वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते दहा वर्षात नरेंद्रजी मोदींनी करून दाखविले असे सांगितले.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला विकास योजना मंजूर केल्या मात्र भाजपा शासनाने मंजूर केलेल्या योजनाचे श्रेय लाटण्याचे प्रकार काँग्रेसवाल्याकडून वेळोवेळी झाले असल्याचे सांगून ऋषिकेश कराड म्हणाले की, ग्रामीण भागाच्या प्रश्नाची काँग्रेसवाल्यांना काहीही घेणं देणं नाही तेव्हा सात तारखेला कमळा समोरील बटन दाबून विकास कामांना गती द्यावी, नरेंद्रजी मोदींना साथ द्यावी आणि सुधाकर शृंगारे यांना आशीर्वाद द्यावेत असे आव्हान केले.
प्रारंभी माजी सरपंच प्रदीप कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले, भाजपाचे दशरथ सरवदे आणि राष्ट्रवादीचे विनोद आंबेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून खासदार सुधाकर शृंगारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. सभेचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी सतीश आंबेकर यांनी आभार मानले. पानगाव येथील जाहीर सभेस पानगाव आणि परिसरातील मतदार बंधू-भगिनी भाजपा व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.