23 C
Pune
Tuesday, December 16, 2025
Homeशैक्षणिक*जि .प .प्रशाला अंबुलगा बु. १९८२ इयत्ता दहावी वर्ग मित्रांचा स्नॆहमेळावा संपन्न*

*जि .प .प्रशाला अंबुलगा बु. १९८२ इयत्ता दहावी वर्ग मित्रांचा स्नॆहमेळावा संपन्न*

लातूर प्रतिनिधी दि. – निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथील जि प प्रशालेतील 40 वर्षानंतर दहावीच्या 1982 बॅच वर्ग मित्रांचा दिनांक 13 आगष्ट 2022 हॉटेल ब्रिज हॉटेल सभागृह लातूर येथे स्नेह मेळावा संपन्न झाला या स्नेह मेळाव्यात अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केले. 1982 बॅचचे एकूण प्रथम श्रेणीमध्ये 22 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन जिल्हा परिषद प्रशाला अंबुलगा बु. या शाळेचे नाव लौकिक केले तसेच येथील त्या वेळेसचे शिक्षक यांनी या बॅचला घडविण्याचे मोलाचे काम केले त्यामुळे सदरील विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठता आले. या बॅचमध्ये डॉक्टर, इंजिनीयर, उद्योजक यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. प्रत्येक क्षेत्रात या बॅचमधील विद्यार्थ्यांनी चौफेर विकास केला. 40 वर्षानंतरचा हा स्नेहमेळावा कायमचा स्मरणात राहील व ऐतिहासिक होईल कारण असा स्नेहमेळावा कधीही आत्तापर्यंत झालेला नाही.
सदरील कार्यक्रमात अनेकांनी आपल्या लहानपणाच्या गमतीजमती सांगितल्या व शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्नेह मिळाव्यात प्रत्येकाने आपली दिलखुलासपणे मनोगते व्यक्त केली. यामध्ये पत्रकार प्रभाकर शिरुरे, इंजिनियर कैलास वारद, डॉ. नंदकुमार हाडगेकर, सुनील पाटील, भरत बिराजदार, विनायक हल्लाळे, श्रीधर वतनेवकील, मल्लिकार्जुन वारद, गोपाळ नाईक, हरी पाटील, राजाभाऊ मोरे, महतेश रंडाळे, बालाजी चलवाड, महेताब मुजावर, प्रमोद कुलकर्णी, सुधाकर बिराजदार, कल्याण वारद, रावसाहेब होरे, नरहरी ईसाळे, तुकाराम काकणे, बलभीम होसूरे, दस्तगीर खेकरवाडे, भानुदास सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चव्हाण, वहीदखा पटेल, घुडू कोतवाल, रमेश पाटील, गोपाळ जाधव, अरविंद सगर, चंद्रशेखर राऊत, कमलाकर जाधव, दास जाधव, यांनी आपली मते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर शिरूरे यांनी केले तर आभार कैलास वारद यांनी मानले
एकंदरीत हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला व शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]