*जेष्ट नागरिक महासंघ स्थापन दिवसा निमित्तानं कार्यक्रमास जेष्टानी उपस्थित राहावे.

*अशोक तेरकर.*
नांदेड…..जेष्ट नागरिकांच्या आडी-आडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्रात जेष्ट नागरिक महासंघाची स्थापना 1979 मध्ये झाली.या महासंघाचा 42 व्वा स्थापना दिवसानिमित्त नांदेड येथे 12 डिसेंबर 2021 सायंकाळी 5 वाजता हाँटेल अतिथी येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.या कार्यक्रमास जेष्टानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आसे अव्हान जेष्ट नागरिक मराठवाडा अध्यक्ष अशोक तेराकर यानी केले आहे.

12 डिसेबर हा दिवस ‘फेस्काँम डे’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम व जेष्ट नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मेळावे.बैठका घेण्यात येतात गेल्या वर्षी कोरोना मुंळे कार्यक्रम घेता आला नाही,यावर्षी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून निवृत्त सनदी आधिकारी एकनाथ (अनिल) मोरे.जेष्ट साहित्यिक.कवयीत्री डाँ.सौ.वृषाली किन्हाळकर.निवृत्त शिक्षण संचालक डाँ.गोविंद नांदेडे.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक तेरकर हे उपस्थित राहाणार आहेत.
नांदेड येथील सर्व जेष्ट नागरिकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाण्याचे अव्हान अशोक तेरकर.डाँ.सौ.निर्मला कोरे भोस्कर.जयवंत सोमवाड.राम पवार.नारायण वाढोणकर.रामचंद्र कोटलवार.डाँ.श्रीमती नंदनी चौधरी.सौ,सुषमा गहेरवार.अँड.एम.झेड.सिद्धीकी यानी केले आहे.सदरील कार्यक्रमास कोरोना 19 सर्व नियमांचे पालन करणार आसल्याचे आयोजकाने सागीतले आहे.











