नांदेड : मराठवाडय़ातील पत्रकारिता क्षेत्रात आपल्या धारदार व लोकाभिमुख पत्रकारिता क्षेत्रात गत चार दशकांत अमिट ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण पाथरीकर यांचे आज दि. १६ आॅगष्ट रोजी निधन झाले. तेर ६८ वर्षाचे होते. पाथरीकर यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथे अन्त्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता.
रामकृष्ण पाथरीकर यानी बी. जे. पदवी नंतर आपल्या पत्रकारितेला लातूर येथे 1983-84 मध्ये प्रारंभ केला. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील समकालीन घडामोडीवर वृत्तांकन व समिक्षण वाचकांच्या पसंदीला उतरले होते. सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून पाथरीकर यांनी पत्रकारिता केली. नव्या पिढीतील पत्रकारांना पाथरीकर यांची पत्रकारिता प्रेरणादायी ठरेल. पत्रकार रामकृष्ण पाथरीकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
पाथरीकर यांनी बरीच वर्षे लातूर मध्ये पत्रकारिता केली. गेल्या काही वर्षात ते आपल्या कुटुंबातील सदस्यांनासह नांदेड येथे वास्तवात होते. कुटुंबिया सोबत लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघ कायम आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.




