देशभरातील ग्राहकांना ७५० नवीन पिकअप्स वितरित
हैदराबाद, 27 सप्टेंबर 2022: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज योधा २.०, इन्ट्रा व्ही२० बाय-फ्यूएल व इन्ट्रा व्ही५० च्या लॉन्चसह भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या पिकअप विभागामध्ये नवीन बेंचमार्क्स स्थापित केले. या शक्तिशाली व क्षमतापूर्ण पिकअप्स आकर्षक नवीन डिझाइनसह येतात आणि या पिकअप्समध्ये सर्वोच्च भार वाहून नेण्याची क्षमता, सर्वात मोठी डेक लांबी, सर्वात लांबचे अंतर पार करण्याची क्षमता असण्यासोबत सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी आवश्यक अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. अनेक शहरी व ग्रामीण उपयोजनांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन व निर्मिती करण्यात आलेले नवीन योधा २.०, इन्ट्रा व्ही२० बाय-फ्यूएल व इन्ट्रा व्ही५० वेगाने वाढणाऱ्या कृषी, पोल्ट्री आणि डेअरी क्षेत्रांच्या विविध गतीशीलता गरजांची, तसेच एफएमसीजी, ई-कॉमर्स व लॉजिस्टिक्स क्षेत्रांच्या वाढत असलेल्या डिलिव्हरी गरजांची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त आहेत. आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त नफा मिळवता यावा यासाठी यापैकी प्रत्येक पिकअप त्यांच्या श्रेणीतील मालकीहक्काचा सर्वात कमी खर्च देतात. टाटा मोटर्सने देशात सर्वोत्कृष्ट पिकअप्स लॉन्च करण्यासोबत त्यापैकी १,००० पिकअप्स देशभरातील ग्राहकांना वितरित केले आहे.

पिकअप्सच्या या नवीन श्रेणीच्या लॉन्चबाबत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्हणाले, ‘’आमची लहान व्यावसायिक वाहने लाखो ग्राहकांना उदरनिर्वाह देण्यासोबत यशस्वी होण्यास सक्षम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची व्यवसाय विकास व उत्तम जीवनाप्रती महत्त्वाकांक्षा वाढत असताना त्यांना आमच्या पिकअप्सच्या नवीन श्रेणीमध्ये योग्य सुविधा मिळतील. हे पिकअप्स विशेषत: ग्राहकांच्या सर्वसमावेशक महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सह-विकसित करण्यात आले आहेत. शहरी, अर्ध-शहरी व ग्रामीण भागांमधील अनेक वापरकर्त्यांना कार्यक्षमपणे सेवा देण्यासाठी या पिकअप्सचे प्रत्येक पैलू बारकाईने तयार करण्यात आले आहेत. या पिकअप्स आकर्षक नवीन डिझाइनसह येतात आणि या पिकअप्समध्ये जड सामान वाहून नेण्याची सर्वोच्च पेलोड क्षमता, मोठ्या आकाराचे भार वाहून नेण्यासाठी सर्वात मोठी डेक लांबी, सर्वोच्च पॉवर टू वेट रेशिओ, अधिक अंतर कापण्यासाठी सर्वात लांबची रेंज आणि तणावमुक्त ड्रायव्हिंगसाठी आरामदायी वैशिष्ट्ये आहेत. दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑल-टेरेन अॅक्सेस आणि भारतातील सर्वात मोठ्या डिलर व सर्विस नेटवर्कच्या पाठबळासह आमच्या पिकअप्सच्या सर्वसमावेशक श्रेणीने दिलेले सर्वांगीण मूल्य तत्त्व अतुलनीय आहे. या आधुनिक पिकअप्सच्या लॉन्चमधून अधिक प्रगती व यशासाठी दर्जात्मक वाहनांसह ग्राहकांना सक्षम व सुसज्ज करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.’’
योधा २.० दर्जात्मक ऑफ-रोड क्षमतेसह सर्वोच्च २००० किग्रॅ रेटेड पेलोड क्षमता देते
शक्तिशाली क्षमतांनी युक्त नवीन योधा २.० खडतर प्रदेशामध्ये देखील सहजपणे प्रवास करू शकते, ज्यामधून देशाच्या दुर्गम भागांमध्ये देखील एकसंधी व जलदपणे सामान वाहून नेण्याची खात्री मिळते. योधा २.० मध्ये अपडेटेड डिझाइनसह प्रबळ लुक्स, टाटा सिग्नचेर ‘ट्रस्ट बार’ आणि स्टायलिश ग्रिलसह इतर कार्यक्षम अपग्रेडट्स आहेत.
योधा १२००, १५०० व १७०० किग्रॅ रेटेड पेलोड पर्यायांमध्ये उपलब्ध आहे आणि ४x४ व ४x२ कॉन्फिग्युरेशन्समध्ये येते. तसेच योधा सिंगल कॅब व क्रू कॅब पर्यायांमध्ये देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार परिपूर्ण मॉडेल व कॅब प्रकार निवडता येते.
इन्ट्रा व्ही५० स्मार्ट पिकअप सर्वोच्च १५०० किग्रॅ रेटेड पेलोड क्षमता व सर्वात मोठी डेक लांबी देते
नवीन इन्ट्रा व्ही५० शहरी व अर्ध-शहरी भागांतील सर्व प्रदेशामध्ये विनासायास कार्यसंचालनांसाठी तिची सर्वोच्च पेलोड क्षमता, अत्याधुनिक केबिन कम्फर्ट, सर्वात लांब सामान कक्ष आणि उच्च ग्राऊंड क्लीअरन्ससह विभागामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित करते.
इन्ट्रा व्ही२० १००० किग्रॅ पेलोड आणि ६०० किमीहून अधिक लांबची रेंज असलेली भारतातील पहिली बाय-फ्यूएल पिकअअप आहे
टाटा मोटर्सने १००० किग्रॅ पेलोड क्षमता असलेली देशातील पहिली बाय-फ्यूएल (सीएनजी + पेट्रोल) व्यावसायिक वेईकल इन्ट्रा व्ही२० लॉन्च केली. या वेईकलमध्ये प्रमाणित इन्ट्रा व्ही२० क्षमतांचा मजबूतपणा आहे आणि ही वेईकल अधिक मूल्य देण्यासाठी सीएनजीचा कमी कार्यसंचालन खर्च होण्याची खात्री देते.
१ लाखाहून अधिक आनंदी ग्राहकांची पसंतीची पिकअप असलेली इन्ट्रा विविध उपयोजनांसाठी उपयुक्त आहे. टाटा मोटर्स यशस्वी ‘प्रिमिअम टफ’ डिझाइन तत्त्वावर निर्माण करण्यात आलेल्या इन्ट्रा श्रेणीमध्ये वॉकथ्रू केबिन, डॅश-माऊंटेड गिअर लेव्हर यासारखी आधुनिक वैशिष्ट्ये आहेत, तसेच व्ही१० व व्ही३० ची वैशिष्ट्ये देखील आहेत. ज्यामुळे विविध वापरांसाठी ही वेईकल स्मार्ट पिकअप निवड आहे.
तसेच ग्राहकांना उद्योगातील सर्वोत्तम विक्री-पश्चात्त सुविधा, स्पेअर्सची सुलभपणे उपलब्धता आणि संपूर्ण सेवा २.० उपक्रमांतर्गत ऑफर करण्यात आलेल्या मूल्यवर्धित सेवांचा देखील लाभ मिळतो. हे लाभ पुढीलप्रमाणे:
टाटा झिप्पी: रिपेअर टाइम अशुअरन्स प्रोग्रामसह ४८ तासांमध्ये* समस्येचे निवारण.
टाटा अलर्ट: रोडसाइड असिस्टण्स प्रोग्रामहस वॉरंटीअंतर्गत असलेल्या वाहनांसाठी २४ तासांमध्ये* खात्रीने समस्येचे निवारण.
टाटा गुरू: देशभरात रिपेअर्स व सर्विसकरिता रोडसाइड व वर्कशॉप सहाय्यता देण्यासाठी ५०,००० हून अधिक प्रशिक्षित टेक्निशियन्स.
टाटा बंधू: अद्वितीय अॅप, जे मेकॅनिक्स, ड्रायव्हर्स व फ्लीट मालक अशा सर्व भागधारकांना गरजेच्या वेळी टाटा गुरूंसह सहजपणे कनेक्ट करण्यासाठी एकाच व्यासपीठावर आणते.
माहितीपूर्ण पद्धतीने ग्राहकांशी संलग्न होण्याकरिता सर्वांगीण, राष्ट्रीय मल्टीमीडिया विपणन मोहिम सुरू करण्यात आली आहे, जी नवीनच लॉन्च केलेल्या पिकअप्सची विविध पैलू व वैशिष्ट्यांची माहिती देते. या मोहिमा सक्रिपणे विविध पिकअप्सच्या प्रमुख पैलूंसोबत टाटा मोटर्स आपल्या ग्राहकांना देणा-या अभियांत्रिकी क्षमता, सर्विस इकोसिस्टिम आणि सुलभ उपलब्धतेला दाखवतात.




