23.4 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeउद्योगट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षाचे...

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षाचे निकाल घोषित

मुंबई, ५ जून २०२२: भारतातील आघाडीच्या एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्यूशन्स प्रदाता कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आज ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षाचे आपले एकत्रित आर्थिक निकाल आज घोषित केले. या वर्षभरात कंपनीचा एकूण महसूल मागील वर्षीच्या तुलनेत १८.५% नी वाढला तर याच कालावधीत कंपनीने आपल्या नफ्यामध्ये ९८% ची वाढ नोंदवली आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने प्रति समभाग २ रुपये डिव्हिडंड आणि दर्शनी मूल्यावर १००% पेआऊट देण्याची देखील घोषणा केली आहे.

कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक १८.५ टक्क्यांच्या वाढीसह २९०५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडी तरतुदीपश्चात कंपनीची मिळकत (ईबीआयटीडीए) ४२१ कोटी रुपये. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हा आकडा २८३ कोटी रुपये होता. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ११.४% होते जे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १४.४% वर पोहोचले आहे. कंपनीचा करपश्चात नफा आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १३५ कोटी रुपये होता तो ९८% नी वाढून २६७ कोटी रुपये नोंदवला गेला आहे.  तर कर पश्चात मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मधील ५.४ टक्क्यांच्या तुलनेत ९.१ टक्क्यांपर्यंत पोहोचले.

एकत्रित का‍मगिरीमधील ठळक बाबी:

कंपनीचा कार्यसंचालनांमधून महसूल वार्षिक १६.२ टक्क्यांच्या वाढीसह ३२५७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडी तरतुदीपश्चात कंपनीची मिळकत (ईबीआयटीडीए) ४५६ कोटी रुपये झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये हा आकडा ३०७ कोटी रुपये होता. ईबीआयटीडीए मार्जिन आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १०.८% होते जे आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १३.९% वर पोहोचले आहे. कंपनीचा करपश्चात नफा आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १५० कोटी रुपये होता तो ९४.७% नी वाढून २९३ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीचे करपश्चात नफा मार्जिन ८.९% जे आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ५.३% होते.

ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत अगरवाल म्हणाले, “२०२१-२१ च्या चौथ्या तिमाहीत आणि संपूर्ण आर्थिक वर्षभरात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव असून देखील सर्व उद्योगक्षेत्रांमध्ये पुरवठा शृंखलांमध्ये घडून आलेले बदल टॉप लाईन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मार्जिनच्या संदर्भात चांगले ठरले. सर्वच सेवा विभागांमध्ये विकास वाटचाल जोमाने सुरु असल्याने महसूल आणि मार्जिन या दोघांमध्ये देखील आजवरची सर्वात जास्त वाढ झाली आहे. ग्राहकांच्या गरजा, आवश्यकता यावर सर्वाधिक भर देण्याच्या टीसीआयच्या मूलभूत व्यवसाय धोरणामुळे हे घडून आले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]