अंतिम दर रु. २४२१/- शेतकऱ्यांच्या खात्यावर रू. २२१ चा हप्ता जमा
- मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विभागात सर्वांधीक गाळप
- देशात पहिल्या हंगामात १० कोटी युनीट विक्रमी वीज निर्यात करणारा कारखाना
- पहील्या गळीत हंगामात विक्रमी १२ लाख मे.टन गाळप
- ऊसशेती यांत्रीकीकरण (हार्वेस्टर)व्दारे ३ लाख मे. टन ऊसतोडणी
- कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपास प्राधान्य
- गळीत हंगाम दिर्घकाळ चालवून सामाजिकदायीत्व जोपासले
- यावर्षी पाऊस चांगला ऊसाचे संगोपन करून हेंक्टरी ऊत्पादन वाढवावे
- पूढील गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू
लातूर प्रतिनिधी १३ जूलै २०२२ :
टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट – १ कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणे अंतिम ऊसदर रु. २४२१/- झाला असून कारखान्याने ऊसदरापोटी या अगोदर रु.२२००/- अदा केले आहेत, तर अंतीम हप्ता रू. २२१/- प्रमाणे जाहीर केला आहे. याप्रमाणे गळीत हंगामात शेतकऱ्यांना ऊसदरापोटी २९५ कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत.

कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळपास प्राधान्य
आदरणीय विलासराव देशमुख साहेब व आदरणीय आईसाहेब वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या आर्शीवादातुन आणी माजी मंत्री आणी आमदार अमित विलासराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात उभा राहिलेल्या मळवटी येथील टवेन्टिवन शुगर्स लि. युनीट १ चा पहिला गळीत हंगाम विक्रमी झाला असून या हंगामात कारखान्याने केलेल्या विक्रमी ऊस गळीताचे साखर उदयोगात मोठया प्रमाणात कौतुक करण्यात आले आहे.
गळीत हंगामात ऊसाचे क्षेत्र वाढल्यामुळे शेतकऱ्याच्या संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू ठेवावेत या परीवाराच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचे संपूर्ण गाळप गाळप होई पर्यत या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्यात आला होता.

मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र विभागात सर्वांधीक गाळप
टवेन्टिवन शुगर्स ली., युनीट – १ मळवटी येथील कारखान्याने पहिल्याच गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये टवेन्टिवन शुगर्स ली. युनीट १ कडून १२ लाख १८ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन १३ लाख ५२ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. हा हंगाम २२४ दिवस चालला. कारखाना कार्यक्षेत्रात अतिरीक्त ऊस होता या ऊसाचे संपूर्ण गाळप करण्यात आले आहे. गळीत हंगामात केलेले विक्रमी गाळप मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सर्वांधिक ऊस गाळप करण्याचा मान पहिल्याच हंगामात पटकावला आहे.
हार्वेस्टरव्दारे ३ लाख मे टन ऊसतोडणी
पहिल्याच हंगाम १० कोटी युनीट विक्रमी वीज निर्यात

टवेन्टिवन शुगर्स ली.च्या या गळीत हंगामाचे महत्वाचे वैशीष्टये म्हणजे या हंगामात साफसफाई कारणाने कारखाना एकदाही बंद राहीला नाही. तसेच मजूरांची कमतरता लक्षात घेऊन जास्तीत जास्त ऊसाचे हार्वेस्टरव्दारे (३ लाख मे.टन) ऊसतोडणी करण्यात आली. तसेच कारखाना उभारणीवेळीच सहविजनिर्मीती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून पहिल्याच हंगामात १४ कोटी २५ लाख युनीट विजनिर्मीती करण्यात येऊन १० कोटी युनीट विज निर्यात करणारा देशातील पहिलाच कारखाना ठरला आहे.
गळीत हंगाम अधिक काळ चालवून सामाजिकदायीत्व जोपासले,
पूढील गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू
गतवर्षी पर्जन्य चांगले होते त्यामुळे ऊसउत्पादनात वाढ झाली. साधारनता कारखाना हंगाम १२० दिवसाचा असतो. पण कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी २२४ दिवस एवढा दिर्घ गळीत हंगाम चालविण्यात आला. यामुळे सर्व ऊसाचे गाळप करणे शक्य झाले आहे.
यावर्षी देखील समाधानकारक पाऊस आहे. यामुळे पूढील वर्षी देखील मोठया प्रमाणात ऊस उत्पादन होईल असे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांनी देखील ऊसपीकाचे चांगले संगोपन करून एकरी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. येणारा हंगाममध्ये मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध होत आहे. या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी मांजरा परीवार गळीत हंगामाची जय्यत तयारी करीत आहे. या ऊसाचे गाळप करण्यास मांजरा परीवार कटीबध्द आहे.

अंतिम दर रु. २४२१/- शेतकऱ्यांच्या खात्यावर रू. २२१ चा हप्ता जमा
या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसास कारखान्याकडून या अगोदर रु.२२००/- प्रमाणे रु. २६८ कोटी १० लाख अदा करण्यात आले असून आत हप्ता रु.२२१/- प्रमाणे २६ कोटी ९४ लाख अदा करण्यात येत असल्याची माहीती कारखान्याचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख व व्हॉइस प्रेसिडेंट श्री समीर सलगर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
शेतकऱ्यांना अधिकात अधिक लाभ मिळवून देण्यासाठी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब तसेच विलास कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी घेतलेल्या भुमिके बददलही व्हा. चेअरमन विजय देशमुख, व्हॉइस प्रेसिडेंट श्री समीर सलगर,संचालक मंडळ, आणि ट्वेंटीवन शुगर्स टीम तसेच शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
——-




