ठाणे🙁 प्रतिनिधी)-आज महाराष्ट्रातील वातावरण कधीही अनिश्चित असले तरिही काँग्रेसचे कार्यकर्ते याचा विचार न करता जनसेवेस प्राधान्य देत असून सचिन शिंदे यांच्या माध्यमातून स्वर्गीय कांतीभाई कोळी यांच्या नावाने खर्या अर्थाने जेष्ठ नागरिकांची सेवा होत असल्याचे शहर काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.
ठाणे शहर(जिल्हा)काॅग्रेस कमिटीच्या वतीनं काॅग्रेसचे दिवंगत नेते माजी आमदार स्वर्गीय कांतीभाई कोळी यांच्या स्मरणार्थ एकविरा मित्र मडळाच्या सभागृहात प्रभाग क्रमांक 29 मधील परिसरातील जेष्ठ नागरिकांकरिता शहर काॅग्रेस सरचिटणीस सचिन शिंदे याच्या वतीने “जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र व मोफत छत्री वाटप”कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष कानडे प्रदेश काँग्रेस सदस्य राम भोसले,स्वर्गीय कांतीभाई कोळी याच्या स्नुषा सौ.नीताताई मंगेश कोळी,काँग्रेस नेते भालचंद्र महाडिक,रमेश इंदिसे,धर्मवीर मेहरोल,सुभाष ठोम्बरे,प्रविण खैरालिया,हिदायत मुकादम,अफजल तलवलकर,अमोल गांगुर्डे,हरेश्वर कोळी,सुरेन भोई,हेमंत भोईर,दीपक ठक्कर आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की नुकत्याच झालेल्या ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेतील आरक्षणात एस् ,टी. प्रवर्गात 29 नंबर प्रभाग आला असून या भागात जरी एस् टी प्रवर्गातील नागरिकांची संख्या मोठी असली तरि या नागरिकांना एस्.टी.चे दाखले मिळण्यास खूप अडचणी आहेत ठाण्यातील अनेक नेत्यांनी यासाठी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले पण अजूनही एस्.टी.दाखले मिळत नाही आता या समाजातील नागरिकांनीच या विरोधात लढा उभारला पाहीजे असे सांगितले या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष सुभाष कानडे यांनीही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते,कार्यक्रम यशस्वी करण्यास एकविरा मित्र मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले.