27 C
Pune
Wednesday, September 10, 2025
Homeसांस्कृतिकठाण्यात रंगला महिला महोत्सव

ठाण्यात रंगला महिला महोत्सव

एकजिनसी अविष्काराची ‘राज्ञी’ ही स्त्रीची खरी ओळख – जयश्री देसाई
● नवनिर्मितीचा संदेश देणारा फॅशन शो नृत्याविष्कार,
मानसन्मान, भरघोस बक्षिसांनी रंगला राज्ञीचा महिला महोत्सव


ठाणे दि. १६ मार्च


“प्रत्येक स्त्रीमध्ये अचाट सामर्थ्य घडविण्याची ताकद असते. तिने फक्त आपल्यातील शक्ती ओळखली पाहिजे. आपलं मानसिक सामर्थ्य वाढवलं पाहिजे. आपल्यातील ‘मी’ चा शोध घेण्यासाठी राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन हे उत्तम व्यासपीठ आहे.” असे मत लेखिका आणि पत्रकार जयश्री देसाई यांनी व्यक्त केले.

व्यास क्रिएशन्स संचलित राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनचा महिला महोत्सव नुकताच ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला. यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, व्यास क्रिएशन्सचा प्रत्येक सोहळा हा माझ्यासाठी घरचा सोहळा असतो. ‘ती’ च्यातील ‘मी’ साठी ” ही ‘राज्ञी’ ची टॅग लाईन मला खूप भावली, आवडली. एकीकडे सामाजिक भान जपत ग्रंथप्रसाराचे महत्व वाचक रसिकांना देणाऱ्या व्यास क्रिएशन्सचा हा वेगळा आयाम सुखावणारा आहे. या प्रवासात निलेशजींना त्यांच्या सहधर्मचारिणी म्हणजेच सौ वैशाली यांची सुरेख साथ लाभत आहे हे मोलाचे आहे. आजवर कुठल्याच प्रकाशन संस्थेने असे धाडस केलेलं नाही ते व्यास क्रिएशन्स यांनी करून दाखवलं आहे म्ह्णून त्यांचे विशेष कौतुक.”

कार्यकमाला टिसाच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर, चित्रपट निर्मात्या मेघना जाधव, कथ्थक नृत्यांगना डॉ. रूपाली देशपांडे, सिने नाट्य अभिनेत्री दीप्ती भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुजाता सोपारकर म्हणाल्या, प्रत्येक महिलेत एक तरी कला असते. त्याचा उपयोग करून ती उत्तम उद्योजिका होऊ शकते. महिला उद्योजकांसाठी शासनाच्या विविध योजनाही आहेत. त्याचाही लाभ घ्यावा. कोणतेही काम, व्यवसाय करताना आत्मविश्वास ढळू देऊ नका, पैशाचं, वेळेचे नियोजन बाळगा.

मेघना जाधव आणि दीप्ती भागवत यांनी चित्रपट, माध्यम क्षेत्रात काम करताना एक स्त्री म्हणून आलेले अनुभव आणि काही आठवणी जागवल्या. दीप्ती भागवत म्हणाल्या, संभाजीराजांच्या पत्नी येसुबाई यांची भूमिका मी साकारत आहे. येसुबाईंची मुद्रा आहे, श्री सखी राज्ञी जयति. त्यामुळे या सोहळ्याशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे.

डॉ. रूपाली देशपांडे यांनी त्यांना आलेले अनेक अनुभव सांगून महिलांना मंत्रमुग्ध केले.

●राज्ञी महिला सभासदांनी कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने केली. साक्षी गायकवाड ह्यांच्या नृत्याविष्कारामुळे महोत्सव अधिक खुलत गेला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेला फॅशन शो राज्ञी महिला सभासदांनी सादर केला. ती वसुंधरा मी वसुंधरा ही याची थीम होती. जुन्या किंवा तुलनेने कमी वापरातील कपड्यांपासून नवीन वेशभूषा या महिलानी तयार करून सादर केली. जवळपास ३० सभासद यात सहभागी झाले होते. या आगळ्या वेगळ्या फॅशन शो चे सर्वच मान्यवरांनी आणि उपस्थितानी कौतुक केले. गायत्री डोंगरे यांनी फॅशन शोचे निवेदन केले. ●
खास महिला दिनाचे औचित्य साधून कस्तुरी- प्रवास सुप्त संपन्नतेचा या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माध्यम क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या संतोषी मिश्रा अनुपमा गुंडे, प्रज्ञा म्हात्रे, प्रज्ञा सोपारकर या महिला पत्रकरांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या निवडक सदस्यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.


हा संपूर्ण महोत्सव राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली नीलेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला. वैशाली गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रस्ताविकामध्ये त्यांनी राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशनची कार्यपद्धती आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. नीलेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतात व्यास क्रिएशन्सची वाटचाल आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक या नात्याने फॅमिली कट्टा या गृहप्रकल्पाची माहिती दिली.

पल्लवी वाघ केळकर यांनी निवेदन केले. राज्ञी सभासद संध्या डेरे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]