27.9 C
Pune
Saturday, February 14, 2026
Homeसांस्कृतिक*डाॅक्टर-जानाईश्री पुरस्कार- डाॅ.कैलाशजी शर्मा यांना जाहीर*

*डाॅक्टर-जानाईश्री पुरस्कार- डाॅ.कैलाशजी शर्मा यांना जाहीर*


.■ जानाई प्रतिष्ठानचा १ जुलै डाॅक्टर डे उपक्रम ◆


लातूरटाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे प्राध्यापक ते संचालक या पदावर कार्यरत असलेले कर्क रोग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे डाॅ. कैलाश शर्मा यांना त्यांनी केलेल्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, क्षेत्रातील नि:स्वार्थ सेवेबद्दल “ डाॅक्टर जानाईश्री “ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 


वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य केलेल्या डाॅक्टरांची ” डाॅक्टर जानाईश्री ”  पुरस्कारासाठी श्री जानाई अभियांत्रिकी प्रतिष्ठान निवड करते. याच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी अशा डाॅक्टरांना डाॅक्टर डे, १ जुलै रोजी त्यांना पुरस्कार जाहीर करते व त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करते. यासाठी यावर्षी या पुरस्कारासाठी कर्करोग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे लातूरचे सुपुत्र टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे प्राध्यापक ते संचालक यापदावर कार्यरत असलेले डाॅ.कैलाशजी शर्मा यांची निवड करण्यात आली आहे.

२५,०००/- रुपये रोख, मानपत्र, महावस्त्र, श्रीफळ, स्मृतीचिन्ह असे ह्या पुरस्काराचे  स्वरूप आहे. रविवार दिनांक ९ जुलै  २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता भालचंद्र ब्लड बॅक सभागृह लातूर येथे पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रांजनी येथील नॅचरल शुगर कारखाण्याचे श्री बी.बी.ठोंबरे भुषवणार आहेत, अशी माहिती श्री जानाई प्रतिष्ठानचे पालक अतुल ठोंबरे, श्री जानाई सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डाॅ.गौरी कुलकर्णी , कार्याध्यक्ष सिए दिलीप रांदड, सचिव अमोल बनाळे, जानाई विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गौरव कुलकर्णी यांनी दिली.
सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन डाॅ.विश्वास कुलकर्णी,डाॅ.राजेश पाटील, डाॅ.अविनाश मुगळीकर, डाॅ.वैशाली टेकाळे, डाॅ.मनोज शिरूरे, डाॅ.पी.के.शहा, डाॅ.ऋजुता अयाचित, डाॅ.आरती संदिकर, डाॅ.अशोक आरदवाड डाॅ.अमित उटीकर, डाॅ.संतोष देशपांडे यांनी केले आहे. डाॅ.रामदास बोकील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]