25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeशैक्षणिक*डिकेटीईच्या करीयरच्या संधी चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*डिकेटीईच्या करीयरच्या संधी चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद*

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटमध्ये ‘१२ वी आर्टस् व कॉमर्स शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना असणा-या करिअरच्या संधी’ व ‘बी व्होकेशनल कोर्सेस करिअर निवडीचा उत्तम पर्याय‘ या विषयावर तज्ञांचे चर्चासत्र संपन्न झाले.या चर्चासत्रासगंगामाई ज्युनिअर कॉलेज, गोविंदराव कॉलेजच्या १२ वी आर्टस् व कॉमर्स विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दहावी व बारावी शिक्षणानंतर नेमकी कोणती वाट पकडायची, करिअरसाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे या बाबतीत विद्यार्थी व पालक यांच्यात मोठा संभ्रम असतो. त्यामुळे करिअरच्या विविध संधीची विस्तृत माहिती विद्यार्थी विद्यार्थीनींना व्हावी हा दृष्टीकोन डोळयासमोर ठेवून या करियरच्या संधी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे पाहुणे, डीकेटीई इंग्लिश मेडियम ज्यु. कॉलेजचे कॉमर्सचे प्रमुख प्रा.व्ही.बी. चौगुले यांनी १२ वी आर्टस् व कॉमर्स नंतर उपलब्ध विविध करियरच्या वाटा जसे की, फॅशन डिझायनिंग, ज्वेलरी डिझायनिंग, सी.ए., सी.एस., बँकींग, एमबीए,आय.सी.डब्ल्यू.ए., एल.एल.बी.,एल.एल.एम., फायनान्स, आय.टी. अ‍ॅडव्हटाईझमेंट, ट्रान्सलेटर, सायबर सिक्युरिटी इत्यादी अनेक कोर्सेस, त्यासाठी द्यावयास लागणारी एन्ट्रन्स एक्झामिनेशन, पात्रता या सर्व विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सरकारी नोकरीमध्ये विद्यार्थ्यांना असणा-या संधीबद्दल सविस्तर माहिती दिली.


डीकेटीईचे शैक्षणिक समुपदेशक अशोक केसरकर यांनी विद्यार्थी व पालकांनी आवड व क्षमता ठरवून एकत्र बसून संवाद साधून करिअरच्या वाटा निवडणे गरजेचे आहे असे भाष्य करत बी.व्होकेशनल कोर्सेस, कॅटरींग, हॉस्पीटल मॅनेजमेंट, समुपदेशन, आहारतज्ञ इ. करिअरच्या वाटा याबद्दल माहिती दिली. तसेच एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. च्या परीक्षांबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी बुध्दीमत्ता, मॅगेझीन, पेपर वाचन, काम्प्युटरचे ज्ञान, इंग्लीश भाषा यावर प्रभुत्व मिळवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.जे. पाटील यांनी केले. डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले यांनी इन्स्टिटयूटच्या प्रगतीचा आढावा घेतला. डीकेटीईमध्ये उपलब्ध बी.व्होकेशनल कोर्सेसबद्दल माहिती देताना ते म्हणाले, वेब डिझाईन अ‍ॅन्ड मोबाईल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट या कोर्समध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांस उदयोन्मुख वेब तंत्रज्ञानाचे व्यवहारीक ज्ञान मिळवता येईल. सोलार पीव्ही पॅनेल इन्स्टॉलेशन अ‍ॅन्ड मेंटेनन्स या कोर्समध्ये पीव्ही सिस्टीम्स, पम्प्स, वेहीकल्स, रुफस, हिटींग अ‍ॅन्ड कुलिंग सिस्टीम्स, फयुएल सेल्स अशा विविध सौर उपकरणासंदर्भात शिक्षण घेता येईल., फॅशन टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड अ‍ॅपेरल डिझाईनिंग या कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांस कटींग, स्टिचींग, पॅटर्न मेकींग, ड्रेस डिझायनिंग, गारमेंट कन्स्ट्रक्शन, एम्ब्रॉयडरी टेक्निक्स, मर्चटायझिंग, कॅड, कॅम सारखे डिझायनिंग सॉफटवेअर्स इत्यादीचे विस्तृत ज्ञान अवगत होईल. तसेच मोबाईल अ‍ॅन्ड टेलिफोन मेकॅनिक या कोर्समध्ये मोबाईलचे हार्डवेअर व सॉफटवेअर रिपेअरींगचे नवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना या कोर्समधून अवगत करता येईल.


चर्चासञानंतर विद्यार्थ्यांनी डीकेटीईच्या विविध लॅबोरेटरीज व वर्कशॉप व लायब्ररीस भेट दिली.या कार्यक्रमास प्रा.एस.डी. गोखले, डॉ. ए.डी. पाटील, प्रा.आर.एन.पुरोहीत, प्रा.वाय.एम. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.प्रतिमा चौगुले यांनी केले.
डीकेटीई मध्ये उपलब्ध व्होकेशनल अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी प्रा.डॉ.एस.जे. पाटील ( ८२७५००२२३९ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डीकेटीई संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]