जिल्हाध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी केली घोषणा
लातूर : प्रतिनिधी – चाकूर येथील पत्रकार
दत्तात्रय रामदास बेंबडे यांची लातूर जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल अशी घोषणा डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ कुलकर्णी यांनी आज केली आहे..

दत्तात्रय बेंबडे हे शेतकरी योध्दा न्युज चॅनल व पोर्टल चालवितात.. दत्तात्रय बेंबडे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत आहेत.विविध दैनिकात त्यांनी या अगोदर कामे केली आहेत.डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्ह्यात नेटवर्क उभे करण्यासाठी दत्तात्रय बेंबडे यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस.एम देशमुख व डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दत्तात्रय बेंबडे यांचं अभिनंदन केलं आहे…