23.6 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeजनसंपर्क*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी...

*डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार.


मुंबई प्रतिनिधी
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर येथे शनिवार दि २९ऑक्टोबर २०२२रोजी होणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.


पत्रकारितेमध्ये दिवसेंदिवस मोठा बदल होत असून सध्या डिजिटल मीडियाचे महत्त्व वाढले आहे. मेट्रोसिटी पासून खेडेगावा पर्यंत सध्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या प्रचंड वाढली आहे .राज्यातील डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्र करून ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची स्थापना केली .सध्या डिजिटल मीडिया मधील सर्व देशातील सर्वात मोठी संघटना म्हणून डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उल्लेख होतो वे पोर्टल, युटयुब चैनल व इतर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना योग्य ते न्याय मिळावा व शासनाने याची दखल घ्यावी यासाठी ही संघटना अहोरात्र झटत असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले .
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे होणार असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून संपादक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ‘डिजिटल मीडिया नवे माध्यम‘ या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून या परिसंवादामध्ये जलतज्ञ अनिल पाटील, एडव्होकेट अतुल पाटील ,प्राध्यापक विशाल गरड ,माहिती जनसंपर्क पुणे विभाग चे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

  यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .यामध्ये कराड येथील डॉ. सुरेश भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  ,निर्माता दिग्दर्शक मंगेश देसाई ,श्रीमती चेतना सिन्हा,

दिग्दर्शक बापूराव कऱ्हाडे ,उस्मानाबाद येथील डॉ.प्रतापसिंह पाटील, सिंधुदुर्ग चे अच्युत सावंत, सोलापूरचे श्रीकांत मोरे ,नागपूर येथील डॉ. संजय उगेमुगे यांचा सन्मान होणार आहे ,यासह विशेष सन्मान म्हणून पत्रकार दीपक भातुसे ,युवा उद्योजक गणेश राऊत ,पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, कोल्हापूर येथील यशवंत पाटील,सातारा जिप उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे ,सामाजिक कार्यकर्ते सरदार पांडुरंग बंगे, सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे ,सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,प्राथमिक शिक्षक हणमंत काटकर,महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे -पाटील ,उद्योजक लालासाहेब शिंदे ,परतवडी येथील नरसिंग दिसले ,शिक्षणाधिकारी किरण लोहार, उद्योजक मनीषा मुळीक यांना विशेष सन्मानित करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेत संघटनेचे महाबळेश्वर अधिवेशन संयोजन समितीचे सदस्य सातारा जिल्हाध्यक्ष विकास भोसले राज्य कार्यकारणी सदस्य सचिन भिलारे, पश्चिम महाराष्ट्र सहसचिव सचिन जाधव सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम तसेच संघटनेचे सल्लागार जयू भाटकर,राज्य कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे व कुंदन हुलावळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]