39 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeलेख*डिजिटल सातबाराचा नवा आयाम …!!*

*डिजिटल सातबाराचा नवा आयाम …!!*

महसूल दिन 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो… या दिवसा निमित्त डिजिटल सातबारा बद्दल महसूल मधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लिहलेला लेख.. आपल्यासाठी…!!

आता घरबसल्या सातबारा पाहता येणार त्याचबरोबर सातबारा मध्ये जर काही बदल करावयाचे असल्यास ते बदल देखील घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील. बऱ्याच वेळा असे घडते की खातेदार हे सातबारा मध्ये पुढील कारणास्तव बदल करू इच्छितात या कारणांमध्ये खरेदी खत आधारित झालेला बदल, जमीन लिस त्या आधारे झालेला बदल कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले तर वारसांच्या नावे करण्यात येणारा बदल, जमिनीवर एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असल्यास बँकेद्वारे टाकण्यात येणारा बोजा त्याचबरोबर जर या कर्जाची परतफेड केली असेल तर कर्ज परतफेडी नंतर बोजाची नोंद कमी करणे या व इतर अनेक कामांसाठी खातेदार यांना संबंधित तलाठी यांच्याकडे जाऊन सर्व कागदपत्रे सुपूर्द करावी लागत होती व त्यानंतर ही नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत होती. परंतु या प्रक्रियेमध्ये फार वेळ जात होता. संबंधित तलाठी यांच्याकडे कागदपत्र सुपूर्द करणे यातही खातेदारांचा वेळ जात होता व त्यामुळे एका व्यक्तीच्या नावावर असलेली जमीन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरण होण्यास बराच काळ लागायचा. त्यातून मधल्या काळात जर पीक विमा मिळाला किंवा भूसंपादन झाले व त्याचा मावेजा मिळाला तर आलेल्या रकमेच्या वाटपा चे अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. सबब नोंदणी कृत खरेदीखत, लीज डिड यांची दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी झाल्याबरोबर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार सातबारा अभिलेखावरून एका व्यक्तीचे नाव कमी करून वैधरीत्या दुसऱ्या व्यक्तीची मालकी हक्कात नोंद करणे हे काम त्वरित गतीने करण्यासाठी शासनाने हक्क प्रणाली आणलेली आहे. यासाठी शासनाने ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये समाविष्ट फेरफार प्रकार-
सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील .


१. वारस नोंद
२. बोजा / गहाणखत दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव बदलणे

            वरील पैकी बोजा दाखल करणे व बोजा कमी करणे या साठीचे अर्ज बँक / वित्तीय संस्था आणि ई करार चे फेरफार घेण्यासाठी चे अर्ज विविध कार्यकारी सोसायटी यांना व सर्व आठही प्रकारचे अर्ज खातेदाराला ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. 

अर्ज कोण करू शकेल ?-
त्यासाठी बँक प्रतिनिधी , सोसायटी चे सचिव व खातेदार यांना https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल व र्त्यासाठी आपले पूर्ण नाव , पत्ता , मोबाइल नंबर , ई मेल आय डी , PAN कार्ड नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल व आपला युजर आय डी व पासवर्ड एकदा तयार करावा लागेल . तयार केलेला युजर आय डी व पासवर्ड जतन करून ठेवावा लागेल व तो प्रत्येकवेळी लॉगीन करण्यासाठी वापरावा लागेल . कोणत्याही व्यक्तीने ऑनलाईन अर्ज दाखल करताच त्याला या ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह पोहोच त्याच्या अर्जाच्या संकेतांक क्रमांकासह ( Aplicatiopn ID) मिळेल. त्याचे आधारे अर्जदार संस्था / व्यक्तीला आपल्या अर्जाची स्थिती याच संकेत स्थावर आपल्या लॉगीनने DASHBOARD वर केंव्हाही पाहता येईल. अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून ही कागदपत्रे स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) अर्जा सोबत पीडीएफ स्वरुपात अपलोड करणे आवश्यक आहे.

  • अरविंद लोखंडे, अप्पर जिल्हाधिकारी, लातूर
  • अमोल राम शेटे,तलाठी, उदगीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]