*Doctors Day Special*
*शासन जनतेच्या भल्यासाठी….*
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना
*१ जुलै डॉक्टर्स डे कोविड आजाराच्या पाश्र्वभूमीवर उपचार आणि त्यासाठीच्या खर्चाचे असणारे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनने अनेकांचा रोजगार गेला अशा स्थितीत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना सर्वांना उपचारासाठी उपलब्ध आहे. या योजनेतून मोठे काम राज्यात होत आहे. याबाबत माहिती दिलीय रत्नागिरीच्या जिल्हा समन्वयक अधिकारी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना डॉ. रेणुका आशिष चौघुले यांनी*
*शब्दांकन प्रशांत दैठणकर*
( जिल्हा माहिती अधिकारी )
रत्नागिरी
गेल्या दीड वर्षापासून आपणच नव्हे तर सारं जग कोरोनाच्या महामारीच्या छायेत आहे. आजारपण म्हटलं की उपचार आणि उपचार करण्यासाठी लागणारा मोठया प्रमाणावरील खर्च हा ठरलेला आहे.
ज्यांनी स्वत:चा आरोग्य विमा काढला आहे, अशांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या स्वरुपाची जागरुकता अद्याप समाजात आलेली नव्हती. आता कोरोनाच्या या संकटामळे ती आलेली दिसते. अशा स्थितीत गरीब आणि हातावर पोट असणारे मजूर तर काही असंघटित क्षेत्रातील कामगार या साऱ्यांना उपचारावर खर्च झेपणारा नाही हे स्पष्ट आहे. त्यात हा नव्या प्रकाराचा विषाणूजन्य आजार असल्याने त्यावरील उपचाराचा खर्च मोठा दुसऱ्या बाजूला एकाच वेळी सर्व जण आजारी पडू नये म्हणून टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करावी लागली.
चाचण्या आणि उपचाराचा खर्च आव्हान म्हणून समोर असताना दुसऱ्या बाजूला रोजगार गेल्याने सामान्यांची स्थिती अत्यंत अडचणीची झाली होती. असा अडचणीचा प्रसंग आल्यास शासनाकडे सर्व जण धाव घेतात आणि राज्यातील शासनाने खूप आधी तरतूद करुन ठेवलेली होती ती महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून.
लोकशाहीत लोकांसाठीचं राज्य चालवताना लोकांसाठी सामाजिक संरक्षण देणारी महत्वाची अशी ही जन आरोग्य योजना आहे. या योजनेंतर्गत ९९६ प्रकाराचे आजार आणि आयुष्मान भारत योजनेत २१३ प्रकारच्या आजारांवर उपचाराची सुविधा देण्यात आलेली आहे.
महात्मा जोतीराव फुले योजनेंतर्गत 1.5 लक्ष तर आयुष्यमान भारत अंतर्गत प्रति कार्डधारक 5 लाखांपर्यंतच्या उपचाराचा खर्च शासन करतं. ही योजना इतर सर्व आजारांसाठी असली तरी कोविडचा यात समावेश नव्हता. शासनाने तो बदल करुन तातडीने राज्यातील प्रत्येकाला हे उपचाराचे सरंक्षण मिळवून दिले आहे.
*याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे*
लाभार्थी : राज्यातील सर्व रेशनकार्डधारक व देशातील आयुष्मान ई कार्डधारक
उपचार संख्या: महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये ९९६ व आयुष्मान भारत योजनेमध्ये अधिक २१३ उपचार एकूण १२०९ उपचारांचा समावेश आहे.
लाभ : १.५ लक्ष महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व ५ लक्ष आयुष्मान भारतई कार्डधारक प्रती वर्ष
रुग्णालये :,
*रत्नागिरी जिल्हयामध्ये एकूण १६* रुग्णालयांचा समावेश आहे या मध्ये ९ शासकीय, तसेच खाजगी ७ रुग्णालयांचा समावेश आहे.
सध्यस्थितीमध्ये एकूण १६ रुग्नालयापैकी ११ कोविड रुग्णालये योजनेतून काम करत आहेत. उर्वरित *५ रुग्णालये नॉनकोविड* काम करत आहेत.
१ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून ७२० कोविड रुग्णांवर उपचार झालेला आहे. तसेच योजने अंतर्गत ५३७० नॉन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत.
कोविड शासकिय रुग्णालये – जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी, उपजिल्हा रुग्णालय – कामथे, दापोली व कळंबणी, तसेच, ग्रामीण रुग्णालय – पाली, मंडणगड, गुहागर, संगमेश्वर
कोविड खाजगी रुग्णालये – लाईफ केअर हॉस्पीटल, चिपळूण, बी.के.एल. वालावलकर, डेरवन, चिपळूण, परकार हॉस्पीटल, रत्नागिरी.
नॉनकोविड रुग्णालये – श्री रामनाथ हॉस्पिटल रत्नागिरी, पं. दीनदयाळ हॉस्पिटल लांजा, एस एम एस हॉस्पिटल चिपळूण, अपरांत हॉस्पिटल चिपळूण, प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी.
याबाबत अधिक माहिती
www.jeevandayee.gov.in
- या संकेतस्थळावर
0000


0000







