डॉ. आडगावकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

0
299

माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. बबन आडगावकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान….

लातूर,-(प्रतिनिधी) – माईर एमआयटी शिक्षण संस्था समुह, पुणे यांच्या वतीने लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बबन देवीदासराव आडगावकर यांनी गेल्या तीन दशकात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या अॅकॅडमी व नॉलेज सेंटरचे वरीष्ठ उपसंचालक व प्रमुख डॉ. के. सी. वोरा यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माईर एमआयटी शिक्षण संस्था समुह, कोथरुड, पुणे येथे शिक्षक दिनानिमीत्त नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात सदरील पुरस्कार डॉ. आडगावकर यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. यावेळी माईर एमआयटीचे संस्थापक-विश्वस्त प्रा. पी. बी. जोशी, माजी अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त व कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, मॅनेजिंग कमिटीचे विश्वस्त आणि अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, सह व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रभारी कुलगुरु प्रा. डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरु डॉ. मिलींद पांडे, अभियांत्रीकीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रसाद खांडेकर हे उपस्थित होते.

डॉ. बबन आडगावकर हे लातूर येथील एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात सन 1991 पासून कार्यरत आहेत. त्यांनी शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक या पदी सेवा दिली असून सध्या ते शरीरशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबतच ते महाविद्यालयातील लोकल गव्हर्निंग समीटी, अँटी रॅगिंग कमीटी व ग्रिव्हन्स रिड्रेसल कमीटीवर कार्यरत आहेत. शिवाय ते मेटसेलचे सभासद, नॅकचे सक्रिय सभासद आणि इंटर्नल क्वालिटी ॲशुरन्स सेलचे समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी शरीरशास्त्र या विषयावर विपूल असे लेखन केले असून त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालीकात 4, राष्ट्रीय 9 असे 13 शोधनिबंध प्रसिध्द झालेले आहेत. तसेच त्यांचे पॅथोफिजियोलॉजी या विषयावर एक पुस्तकही प्रकाशीत झाले असून त्यांचा विविध वैद्यकीय कार्यशाळात सक्रीय सहभाग राहिलेला आहे.

डॉ. आडगावकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आ. रमेशअप्पा कराड, कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड, अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, शैक्षणीक व प्रशासकीय संचालीका डॉ. सरिता मंत्री, डॉ. अजय गावकरे, डॉ. सचिन सोमवंशी, डॉ. सचिन भावठाणकर, डॉ. महेश उगले, डॉ. मुकुंद भिसे, डॉ. अभिजीत मुगळीकर, डॉ. अरुण दैठणकर, डॉ. दिनकर काळे, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. राजेंद्र मालु, डॉ. सी. एस. पाटील, डॉ. लक्ष्मण कस्तुरे, डॉ. शैला बांगड, प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, प्राचार्य सर्वनन सेना, प्राचार्य पल्लवी जाधव, डॉ. प्रमोद मुळे, डॉ. भागवत शेळके, डॉ. स्नेहलता माळी, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, प्रशासकीय अधिकारी मधुकर गुट्टे, जनसंपर्क अधिकारी श्रीधर घुले, लिपीक अनंत बिक्कड, सेवक उध्दव देशमुख, देविदास तगारे, श्री बदणे यांच्यासह प्राध्यापक, डॉक्टर व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here