डॉ. कमलाकरराव परळीकर यांना जीवनगौरव पुरस्कार
पूर्णवाद संगीत कला आकादमीतर्फे पूर्णवाद संगीत संमेलन
परभणी,दि.29(प्रतिनिधी) : ग्रंथराज पुर्णवाद अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 5,6 व 7 जानेवारी रोजी ओम पुर्णवादी संगीत कला अकादमीच्या वतीने परभणीत आयोजित केलेल्या पूर्णवाद संगीत समारोहात महामहोपाध्याय तथा सूरमणी डॉ. कमलाकरराव परळीकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा सुश्री डॉ. संगीता गणेश पारनेरकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. पारनेरकर यांनी ग्रंथराज पूर्णवाद अमृत महोत्सवी पर्वानिमित्त आयोजित केलेल्या पूर्णवाद संगीत समारोहाची माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक व्यंकटेश कुरुंदकर, पूर्णवाद परिवारातील एच.एम. कुलकर्णी, विनय मोहरीर, रमाकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पारनेरकर यांनी, शुक्रवार 5 जानेवारी रोजी म्हणजे संमेलनाच्या पहिल्या दिवशी पूर्णवाद परिवाराने परमपुज्य डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या पवित्र उपस्थीतीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा व पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिध्द सतारवादक पंडीत उस्मान खाँ साहेब यांच्या शुभहस्ते येथील सुरमनी डॉ. कमलकरराव परळीकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत केले जाईल, असे त्या म्हणाल्या.
दि. 6 जानेवारी शनिवार रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत शास्त्रीय गायनाची मैफिल होणार असून यात ग्वालेर घराण्याची सुप्रसिध्द गायीका श्रीमती अपूर्वा गोखले यांचे सुश्राव्य गायन होणार आहे. त्यांना तबला स्वप्नील भीसे, हार्मोनियमवर डॉ. चैतन्य कुटे साथ संगत करणार आहेत. दुपारी 4 ते 5.30 या वेळेत प्रमुख घराण्याचे रियाज आणि सांगीतिक सौंदर्यस्थळे या विषयावरील सभा होणार आहे, यात डॉ. चैतन्य कुटे (पुणे), डॉ. अतिद्व सरवडीकर (मुंबई), विश्वेस सरदेशपांडे (मुंबई), मानस विश्वरुप (मुंबई), सुरश्री शिवानजी दसवकर (पुणे) यांचे गायन होणार असून त्यांना तबल्यावर अभिजीत बारटक्के तर हार्मोनियमवर बीराजदार चक्रदेव हे साथसंगत करतील. याच दिवशी तीसर्या सत्रात भज गोविंदम एक वेगळ्या प्रकारचा भरतनाट्यम नृत्यविष्काराचे सादरीकरणर होणार आहे. प्रतिथयश नृत्य कलाकार डॉ. स्वाती दैठणकर या त्याचे सादरीकरण करणार आहेत. चौथ्या सत्रात प. पू. डॉ. विष्णु महाराज पारनेरकर यांच्या उपस्थीतीत मराठवाड्यातील संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ऋषितुल्य कलावताचा कृतज्ञता समारंभ आयोजित केला आहे.
दि. 07 जानेवारी रविवार रोजी सकाळी 10 ते 12 खुला मंच राहणार असून दुसर्या सत्रात दुपारी 4 ते 5.30 तन्मय देवचके, अशीष कुलकर्णी यांचे तबला बादन तर तीस-या सत्रात सायंकाळी 6 ते 7.30 पंडीत माणीकराव मुंढे, सुखदेव मुंडे यांचे पखवाज वादन होणार आहे. चौथ्या सत्रात रात्री 8 ते 10 या वेळेत पद्मश्री पंडीत उल्हासजी कशाळकर यांचे गायन होणार असून यात संवादीनीवर तन्मय देवचक्के तर तबला आशय कुलकर्णी यांची साथसंगत राहणार आहे. या तीन दिवशीय कार्यक्रमात श्रोते आणि रसीकांनी उपस्थीत रहावे, असे आवाहन संयोजीका तथा ओम पुर्णवादी संगीत कला अकादमीच्या अध्यक्षा डॉ. संगीता गुणेश पारनेरकर, संगीत संमेलनाध्यक्ष तसेच स्वागताभिलाशी एकनाथ (अनिल) मोरे, जीवन कला मंडळ, परभणीचे अध्यक्ष भागवत खोडके पाटील, उपाध्यक्षा, शशी अय्यर, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंदकर, सचिव गणेश जोशी, पुर्णवादी संगीत कला अकादमी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, विनय मोहरीर आदींनी केले आहे.
या कार्यक्रमा संदर्भात अक्षय कुलकर्णी (मो नं 9689591021) सौ. वैष्णवी मुळे (मो.नं. 7498154141), श्रीकांत देशपांडे (मो नं. 9421456517), विनय मोहरीर (मो.न.ं 9423143984) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.