डॉ.जनार्दन वाघमारे यांचे स्मारक लातुरात व्हावे

0
12

माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे स्मारक लातुरात व्हावे

लातूरच्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांचा सूर

लातूर,( प्रतिनिधी) :–महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, सुप्रसिद्ध साहित्यिक, नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार ‌ डॉ. जनार्दन वाघमारे ‌ यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी नांदेडच्या नरहर कुरुंदकर स्मारकाच्या धर्तीवर लातूर येथे त्यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे‌, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे, असा सूर लातूर येथे शुक्रवारी आयोजित डॉ. जनार्दन वाघमारे श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवर वक्त्यांनी व्यक्त केला.

येथील दयानंद सभागृहात झालेल्या या श्रद्धांजली सभेत मराठवाड्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.‌ ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार प्रा.‌ दत्ता भगत आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांच्या शोक संदेशांचे यावेळी वाचन करण्यात आले.महाराष्ट्राच्या वैचारिक बांधणीत डॉ. वाघमारे यांचा मोलाचा वाटा असून सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान दिशादर्शक आहे,‌ असे सांगून डॉ. नागोराव कुंभार यावेळी म्हणाले, सामाजिक न्याय समता या मूल्यांचा आग्रह धरणारे सर्वसमावेशक विचारवंत म्हणून डॉ. वाघमारे यांच्या विचारांची जपणूक झाली पाहिजे त्यामुळे भविष्यात पुरोगामी चळवळीला अधिक बळ आणि दिशा मिळेल. तर, सर्वोदय चळवळीचे नेते व इतिहासाचे अभ्यासक प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांनी दलित व ग्रामीण साहित्याचा वारसा, वाचन संस्कृती, संविधान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान प्रकल्पाचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊ या, असे सांगितले.जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, सामाजिक, शैक्षणिक , राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात‌ लातूरची ओळख महाराष्ट्राबाहेर निर्माण करणाऱ्या डॉ. वाघमारे यांची वैचारिक ग्रंथसंपदा ‌ राज्याला मार्गदर्शक अशीच आहे. लातूरने शैक्षणिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्राची मक्तेदारी मोडून काढली आणि लातूर पॅटर्न तयार केला या लातूर पॅटर्न चे सर्व श्रेय डॉ. वाघमारे यांनाच जाते. लातूरमध्ये त्यांचे उचित स्मारक उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते यांनी केले.

भूकंप ही विस्थापतिमानुन आपल्या स्वप्नातील जातीपाती विरहित चलबुर्गा हे गाव डॉ. वाघमारे यांनी उभारले होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतलेले डॉ. वाघमारे हे तळागाळापर्यंत शिक्षणाचा विस्तार व्हावा यासाठी कायम प्रयत्नशील राहिले त्यांचा विचार शैक्षणिक कार्य हे पुरोगामी चळवळीला बळ देणारे आणि गती देणारे आहे असा विचारही अनेक मान्यवर व त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जितेंद्र वाघमारे, लक्ष्मीरमण लाहोटी , डॉ. सुचेता वाघमारे-शास्त्री, आकांक्षा जाधव-शास्त्री, प्राचार्य डॉ. एम. एस .दडगे, ॲड. धनंजयभाई पाटील, डॉ. राम बोरगावकर, डॉ. रमेश भराटे, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, कवी योगीराज माने, माजी मंत्री विनायकराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश्वरराव देशमुख, दत्ता सुरवसे, भारत सातपुते, डॉ. रणजीत जाधव, ॲड. वसंतराव उगले, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा‌ कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, अरविंद कांबळे, प्राचार्या कुसुम मोरे, प्रा. दत्ता सोमवंशी, प्राचार्य डॉ, महादेव गव्हाणे, शरद झरे, शेतकरी नेते लक्ष्मण वांगे, विजय चव्हाण, अजित पाटील कव्हेकर, प्रा. नयन राजमाने, बाबासाहेब सीतापुरे, ओमप्रकाश आर्य, शिवदासजी लखादिवे, विद्याधर कांदे- पाटील, रमेश दापके, प्रा. सतीश यादव, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, डॉ. जयद्रथ जाधव, बाबा सितापुरे, ओमप्रकाश झुरुळे, आदी मान्यवर वक्त्यांनी डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या शैक्षणिक व वैचारिक प्रवासाचा वेध घेतला. डॉ. वाघमारे यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. सभेच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. नागोराव कुंभार, डॉ दिगंबर नेटके, प्रा सुधीर साळुंखे, प्रा. डॉ. विनोद चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. या श्रद्धांजली सभेचे संचलन डॉ. विवेक सौताडेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here