भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशाची अखंडता कायम
: भाजपा नेते अरविंद पाटील निलंगेकर
…………
निलंगा/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच देशाची अखंडता व राष्ट्रीय एकात्मता टिकून राहिली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे भारतीय राज्य घटनेचा आदर करणारे सरकार असून अनेक क्रांतीकारक निर्णय घटनेच्या चौकटीत बसवून घेत असल्याचे मत भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केले.

युवानेते अरविंद पाटील निलंगेकर व लातूर लोकसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यानी रविवारी ता. 14 रोजी सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त अशोक नगर व टाऊन हॉल निलंगा येथे पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की, एक कणखर पंतप्रधान देशाला लाभले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय राज्य घटनेचा आदर करणारे पंतप्रधान आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार- विचार समाज बांधवानी अंगिकारून आपल्या जिवनात यश संपादन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपा महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपल्या देशाची किर्ती जागतिक स्तरावर उंचावली आहे. मोदी हे भारतीय राज्यघटनेला वंदनीय मानणारे पंतप्रधान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खा. श्रृंगारे यांनी शहरातील अशोक नगर, समता नगर, येथील समाज बांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी लातूर लोकसभा निवडणूक सह प्रमुख अॅड. भारत चामे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंडितराव धुमाळ, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे, रिपाईचे अंकुशजी ढेरे, देवणी तालुकाध्यक्ष अनिल इंगोले, शिवसेना निलंगा तालुकाप्रमुख भगवान जाधव, मनसे तालुकाध्यक्ष सुरज पटेल, जिल्हा उपाध्यक्ष हसन चाऊस, संदीप कांबळे, विलास वाघमारे, मधुकर कांबळे, चेअरमन दगडु साळुंके, तालुका अध्यक्ष कुमोद लोभे, शेषेराव ममाळे, भाजपा शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी, दत्ता मोहळकर, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, माजी नगरसेवक शंकर भुरके, अविराज पाटील, किशोर जाधव, बाळासाहेब पाटील, तम्मा माडीबोने, नसीम खतीब, दयानंद कांबळे, वाल्मिकी चव्हाण, राणा आर्य, पृथ्वीराज निंबाळकर, सागर पाटील, विष्णू ढेरे, सुमित इनानी, खदीर मासुलदार, रमेश कांबळे आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
