*डॉ.शिवराज नाकाडे प्रा.कंकाळ यांचा ऋण निर्देश सोहळा संपन्न*

0
140

लातूर / दयानंद विधीमहाविद्यालयातील माझा काळ अत्यंत मोलाचा ठरला. लातुरातील राजानारायणलाल लाहोटी नथमलसेठ इनानी, रामगोपाल राठी, माणिकराव सोनवणे, रानबा मंदाडे, चंद्रशेखर बाजपाई, कल्याणजी भाई यांच्या संकल्पनेतून दयानंद शिक्षण संस्थेची निर्मिती झाली. शेतकर्‍यांची व गोर गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे असा त्यांचा उदात्त हेतू होता. श्री. शिवराज पाटील चाकूरकरांनी त्यांना मोलाचे साह्य केले.
या संस्थेतून आज हजारो लाखो विद्यार्थी देशात व देशा बाहेर विविध मोठ्या पदावर यशस्वी रित्या कार्यरत आहेत याचा आम्हास अभिमान वाटतो असे प्रतिपादन दयानंद विधी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कुलगुरू डॉ. श्री. शिवराज नाकाडे यांनी केले.
 डॉ. श्री. शिवराज नाकाडे व प्रा. भास्करराव कंकाळे यांचे लातूर येथून शिक्षण घेतलेल्या अनेक वकील बंधुंनी त्यांचेप्रती कृतज्ञता म्हणून ऋण निर्देश सोहळा दयानंद कॉलेजच्या सभागृहात आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायूमर्ती श्री. अंबादास जोशी हे होते. व्यासपिठावर सत्कार मूर्ती श्री. भास्करराव ककांळ, डॉ. शिवराज नाकाडे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे, ऍड. अण्णाराव पाटील श्री. लक्ष्मीरमण लाहोटी, श्री. रमेशजी बियाणी ऍड. आर. वाय शेख लॉकॉलेच्या प्राचार्या श्रीमती नाथानी, लातूर वकील मंडळाचे अध्यक्ष श्री. महेश बामणकर हे होते.
न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून हा सत्कार सोहळा आयोजित झाला होता. यासाठी त्यांनी ही जबाबदारी ऍड. बळवंत जाधव, ऍड. गवारे, ऍड. अशिश बाजपाई,  ऍड. राजमाने, व्यंकटराव बेद्रे, ऍड. काळे, अण्णाराव पाटील, ऍड. संजय पांडे यांचेवर सोपवली होती.विविध बैठका घेवून व अनेकांशी संपर्क साधून वरील वकील बंधुंनी हा कार्यक्रम घडवून आणला.
 याप्रसंगी प्रा. कंकाळ सरांनी लॉकॉलेजातील विषय लेबर लॉ. कंपनी लॉ. इत्यादी विषयी सखोल माहिती सांगून सर्वा प्रती आभार मानले. अध्यक्षपदावर न्यायमूर्ती श्री. अंबादास जोशी यांनी सविस्तर व योग्य अशा शब्दात न्याय दानाचे संबधातील अनेक उदाहरणे दिली. न्याय देतांना कृती करणाराचा हेतु लक्षात घेतला तर त्याला न्याय मिळण्यास मदत होते असेहि प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी न्या. शिवकुमार डिगे यांनी आपल्या कॉलेज जीवनाच्या अनेक आठवणीना उजाळा दिला. डॉ. शिवराज नाकाडे व प्रा. कंकाळ यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
ऍड. अण्णाराव पाटील(महाराष्ट्र गोवा बारचे सदस्य) यांनी वकील न्यायाधीश वकीली व्यवसाय इत्यादी बाबत महत्वाचे भाष्य केले. व डॉ. नाकाडे व प्रा. श्री. कंकाळ याच्या शिस्त बध्दतेचे व विद्वत प्रचूर ज्ञान देण्याचे कार्याची प्रशंसा केली ऍड. बळवंतराव जाधव यांनी आपल्या खुमासदार भाषणातून सभागृहाच्या टाळ्या मिळवल्या.
प्राचार्य नाथानी यांनी हि मनोगत व्यक्त केले. ऍड. व्यंकटराव बेद्रे, ऍड. प्रदीप गंगणे ऍड. आगरकर, ऍड. मधुकर राजमाने, ऍड. श्रीकांत उटगे व इतर अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रसंगी त्यावेळीचे कार्यालयीन स्टाङ्ग श्री. बिरले, श्री. मंत्री यांचाहि सत्कार केला. श्रोत्यांची, प्रेक्षकांची व वकील मंडळाची व लॉ. कॉलेजातील विद्यार्थ्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रम चारतासपेक्षा अधीक वेळ पण प्रबोधनपर असा झाला.
वकील मंडळाचे अध्यक्ष श्री. बामणकर यांनी आभार मानले. प्रा. श्री. कंकाळ सरांना आर्थिक साह्य व्हावे म्हणून अनेक त्यांच्या शिष्य समुहाकडून, संयोजनसमीती, दयानंद शिक्षण संस्था, न्यायमूर्ती मंडळी कडून निधी व मानपत्र देण्यात आले.
ऍड. श्री. गलाले व ऍड. श्री. उदय गवारे यांनी मापत्राचे वाचन केले. कार्यक्रमास ऍड. मनाळे, सर्व जजेस ऍड. ढगे, व्यंकटराव बेद्रे, श्री. आगरकर, ऍड. मधुकरराव राजमाने, ऍड. आशीष बाजपाई, ऍड. इंगळे, ऍड. संजय पांडे, प्रा. बी.व्ही. मोतीपवळे, डॉ. दडगे इत्यादी असंख्य वकील मंडळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here