परभणी: ता 29– येथील जुन्या पिढीतील नामांकित डॉक्टर श्रीधर साने यांचे बुधवारी (ता.29) रात्री अल्प आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते 90 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपूर्वीच डॉ.साने यांनी वैद्यकीय व्यवसायात 62 व्या वर्षात पदार्पण केले होते. परभणीत वैद्यकीय व्यवसाय पदार्पण केल्यापासून डॉ. साने यांनी गोरगरीब,उपेक्षित, रुग्णांच्या सेवेत स्वतःआयुष्यभर झोकून दिले होते. कोरोंनाच्या आपत्ती काळात ते रोज नियमितपणे रूग्णांना सेवा देत होते. गरिबांचे मसिहा अशीच डाँ.साने यांची प्रतिमा होती. शांत,संयमी, मृदु स्वभाव असणारे असणारे डॉक्टर साने अखेर पर्यंत म्हणजे शुक्रवारी सांयकाळपर्यंत ते रूण सेवेत कार्यरत होते.शनिवारी पहाटे ते पडल्याचे निमित्त झाले; त्यांच्यावर उपचार सूरू असतांना त्यांचे बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले.
दरम्यान डॉ. साने यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता.30) दुपारी साडेबारा वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ .साने यांच्या पश्चात मूलगा डाँ.आनंद साने, मूलगी सौ वर्षा चितळे, सून अँड.सूजाता साने, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान डॉक्टर साने यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारात मोठा धक्का बसला आहे. डॉ. साने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वंयसेवक, संघ परिवारातील नूतन विद्या समिती या नामांकित शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, तसेच जनकल्याण सहकारी पतसंस्था या संस्थेचेही ते दीर्घ काळ उपाध्यक्ष होते.शहरासह जिल्ह्यात मोठा परिवार होता.