दिनविशेष
ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचा आज स्मृतिदिन.
१९६९ साली नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. पिंजरा, सामना, सिंहासन, सुगंधी कट्टा, मुक्ता, देवकीनंदन गोपाळा, झाकोळ, कस्तुरी, सोबती, पांढरं, मसाला अशा अनेक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या.
भारत सरकारतर्फे १९७४ साली डॉ. श्रीराम लागू यांना ‘पद्मश्री’, महाराष्ट्र शासनातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार, २००० साली ‘पुण्यभूषण’, तसेच त्यांना ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
विनम्र अभिवादन!