डॉ. सुनील गायकवाड यांना पुरस्कार

0
226

डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना “बुद्धा पीस अवॉर्ड २०२१” ने म्यानमार अेम्बसीमध्ये सन्मानीत.

दिल्ली- ( विशेष प्रतिनिधी)

लातूरचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना आज दिल्ली येथे म्यानमार अेम्बसी च्या शानदार कार्यक्रमात यावर्षी चा “बुद्धा पीस अवॉर्ड”मैत्री पीस फाउंडेशन आणि म्यानमार अेम्बसी च्या संयुक्त विद्यमानाने २०२१ चा हा मानाचा पुरस्कार अखिल भारतीय भिक्खू संघनायक पुज्यनिय भंते ए बी ज्ञानेश्वर आणि भारत सरकार चे केंद्रीय पेट्रोलियम तथा श्रम रोजगार राज्यमंत्री आदरणीय रामेश्वर तेली आणि म्यानमार चे अेम्बसी मोइ क्याओ औंग़ यांच्या हस्ते देण्यात आला.

१६ व्या लोकसभा मध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि जागतिक शांततेसाठी झालेल्या भूतान च्या सोशल जस्टिस स्टँडिंग कमिटी ला भारतीय संसदेच्या शिस्ट मंडळाचे चेअरमन या नात्याने अत्यंत चांगला कामाचा ठसा भूतान च्या बैठकीत उमटवला होता.त्या कार्याची दखल घेऊन हा “बुद्धा शांतता पुरस्कार” देऊन मा खा डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ सुनील गायकवाड यांना याच महिन्यात हा तिसरा अवॉर्ड मिळाला आहे. नुकताच इंडियन स्टार अवॉर्ड २०२१, छत्रपती शिवाजी महाराज अवॉर्ड २०२१,आज मिळालेला “बुद्धा पीस अवॉर्ड २०२१” अशा मानाच्या पुरस्कारांनी त्यांचं आणी त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले.

या कार्यक्रमात विशेष उपस्थित असलेले पुरस्कार प्राप्त मध्ये प्रसिद्ध गायक पद्मश्री कुमार सानू, प्रसिद्ध फिल्म निर्माता रमेश थेटे,अनेक क्षेत्रातील मान्यवर यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.या पुरस्कारा बद्दल डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here