25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*ड्युटीवर असताना दारू प्याल तर थेट घरी जाल एसटी महामंडळाने नियम केले...

*ड्युटीवर असताना दारू प्याल तर थेट घरी जाल एसटी महामंडळाने नियम केले कडक*

औरंगाबाद ;( प्रतिनिधी) – : अपघातासारख्या गंभीर घटना टाळण्यासाठी चालकाने मद्यप्राशन केलं आहे की नाही, यासंबंधीची खात्री करूनच त्यांना स्टेअरिंगवर बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे .एसटी महामंडळाने प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी नुकताच हा निर्णय घेतला असून या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या बाबतच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकाकडून नुकत्याच देण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या गाड्यांना होणाऱ्या अपघातामध्ये घट होण्यास मदत होणार आहे.


एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीनुसार वाहतूक नियंत्रकांनी कामावर जाणाऱ्या चालक आणि वाहकांनी मद्यप्राशन केलं आहे की नाही याची खात्री केल्यानंतरच यापुढे बसस्थानकामध्ये गाडी चालक आणि वाहकाच्या ताब्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कर्तव्यावर हजर होणाऱ्या चालकाने मद्यप्राशन केले असल्यास त्याची माहिती वाहतूक नियंत्रकांना स्थानकप्रमुख अथवा आगारप्रमुखांना द्यावी लागणार आहे.संबंधित चालकाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली जाणार असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

विशेष पथक

राज्यातील सर्व विभागांमध्ये गोपनीय पद्धतीने चालकाने मद्यप्राशन केली आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी मार्ग तपासणी पथके, वाहतूक निरीक्षक, चालन प्रशिक्षण आणि सुरक्षा व दक्षता विभागातील पर्यवेक्षक यांच्यामार्फत मोहीम राबवली जाणार असून यामध्ये चालकाने मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कडक कारवाई करावी, अशा सूचना एसटी महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत.

तर होणार बडतर्फ

कामावर असताना चालक अथवा वाहकाने मद्यप्राशन केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर एसटी महामंडळ प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई केली जाणार आहे. मद्यप्राशन केलेल्या चालक-वाहकाला थेट घरचा रस्ता दाखवला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]