यात्रा, जन्मोत्सव,हरिजागर, कुस्त्या, नाटक आधी भरगच्च कार्यक्रम
लातूर; (प्रतिनिधी)
औसा तालुक्यातील शिवली येथील नवसाला पावणार्या श्री हनुमान देवस्थानची यात्रा कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी शनिवार दिनांक १६ ते १९ एप्रिल पर्यंत सदर यात्रा भरणार असून या निमित्त विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, याचा लाभ घेण्याचे आव्हान देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.विशेष म्हणजे पुरातन काळात मंदिरात लावण्यात आलेला दिप आजही पाजळत असल्याने या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाल्याने जिल्हयासह राज्यातील अनेक भाविक आपला नवस पुर्ण करण्यासाठी शिवली दाखल होत असल्याने दिवसेंदिवस या हनुमान देवस्थानला मोठे महत्व प्राप्त होत आहे.

लातूर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या औसा तालूक्यातील शिवली या गावात श्री हणुमानाचे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे नवसाला पावणारा हनुमान म्हणून राज्यभर या देवस्थानची ख्याती प्राप्त झालेली आहे. येथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या नंतर येणार्या शनिवारपासून यात्रा भरते.दरम्यान कोरोणाच्या काळात मागील दोन वर्षात सदर यात्रा भरलेली नव्हते मात्र तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा यात्रा भरत आहे.विशेष म्हणजे येथील मंदीरामध्ये पुरातन काळापासून पाजळत असलेला दिप आजही विजलेला नाही याची ख्याती सर्वदूर असल्याने राज्याच्या कानाकोपर्यातून हजारो भाविक यात्रेच्यानिमित्ताने दर्शनासाठी शनिवारी आवर्जून शिवलीत येतात.
सदरील यात्रा महोत्सवात दि.१६ एप्रिल रोजी सकाळी ६ वा.ते दुपारी १२ पर्यंत श्री.हनुमान जन्मोत्सव व अभिषेक होईल. दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपयर्ंत भक्तांचे लोटांगण व प्रसाद वाटप आणि रात्री ९ नंतर हरिजागर होणार आहे.
रविवार,दि.१७ एप्रिल रोजी कल्पना गायकवाड (नरसी नायगाव)व जयश्री भुवूरे (तुळजापूर) यांचा भारुड कार्यक्रम होणार आहे, तसेच यादिवशी सौभाग्य नाही नशिबा माझ्या हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.
सोमवार,दि.१८ रोजी मल्लाचा भव्य कुस्ती कार्य्रकम आयोजिला आहे. सायंकाळी ६ ते मंगळवारी पहाटे ६ दरम्यान श्री लक्ष्मण शक्ती भक्तीमय कार्यक्रम होईल.मंगळवार,दि.१९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता श्री ची महाआरती व दिवसभर महाप्रसादाचे वाटप होणार आहे. रात्री ९ वाजता पुणे येथील मायबोली लोकरंगचा ऑर्केस्ट्रॉ ठेवण्यात आलेला आहे.
तेव्हा कोरेानानिर्बंधामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या,वरील कालवधीत मोठ्या भक्तीभावाने होत असलेल्या या श्री हनुमान यात्रा महोत्सवाचा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त शिवली ग्रामस्थाच्यावतीने करण्यात आले अ