22.8 C
Pune
Saturday, March 7, 2026
Homeसांस्कृतिकतळेगाव येथील नाथषष्ठी महोत्सवास प्रारंभ

तळेगाव येथील नाथषष्ठी महोत्सवास प्रारंभ

मनुष्याला जगण्याचा अर्थ कळला पाहिजे … श्री गुरुबाबा महाराज .

. लातूर ( माध्यम वृत्तसेवा ):-दुर्लभ असा मनुष्य जन्म आपणास मिळाला त्या जगण्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे आणि त्यासाठी केवळ विचाराचा नव्हे आचरणाचा परमार्थ करावा आपल्यात अहंकाराला अजिबात थारा देऊ नये असा संदेश नाथ संस्थानचे पिठाधीपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांनी दिला आहे. बुधवार दिनांक 4 मार्च रोजी तळेगाव बोरी येथे नाथ मंदिरात चक्रीभजनानंतर ज्ञानेश्वरी निरूपणात गुरुबाबा बोलत होते.

श्रीकृष्ण परमात्म्यांनी उद्धवास जो उपदेश केला तो ध्यानी घ्यावा यात एकूण 15 दोष निर्देशित केले आहेत ज्यात चोरी, हिंसा, खोटेबोलणे सभ्यतेचा देखावा करणे, ढोंग करणे कामांध, राग अनावर होणे, गर्व ताठपणा, अहंकार, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार, वाईट आहार व्यसन हे दोष केवळ नामस्मरण संत संगती व शुद्ध परमार्थ गुरु सेवेतून नष्ट होऊ शकतात याकरिता नैतिकता आचरण विचार शुद्धता निरपेक्ष सेवेची जरुरी आहे असे गुरुबाबा म्हणतात .

भक्तीची ताकद फार मोठी आहे आपल्याला ज्ञानेश्वरी गाथा यातून चांगल्या वाईट बाबीचा निवाडा करण्याचे ज्ञान प्राप्त होते अंतर बाह्य मन निर्मळ होते आणि जीवनाचा अर्थ उमजतो असे महाराज म्हणाले काही चुका घडल्या तर क्षमा याचना करावी यात मोठी ताकद आहे.प्रत्येक अनुग्रहित शिष्यांनी चक्रीभजन गुरु मंत्राचा जप केलाच पाहिजे यामध्ये तडजोड करू नये हे कराल तर देव निश्चित कृपा करेल असे महाराजांनी सांगितले.

जे होईल, चालेल, घडेल ते सारे नाथांच्या

इच्छेने व कृपेनेच !जगतातच नव्हे

आपण कुठलेही कर्म करो त्याची फलश्रुती आपल्या हेतूवर अवलंबून असते जे काही घडते ते नाथांच्या इच्छेने मर्जीने ताकतीने आणि कृपेनेच घडेल असेविचार सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले 4 मार्च रोजी नाथ मंदिरात गुरुबाबांच्या प्रवचनानंतर उपस्थित शिष्य समुदायास संवाद करताना महाराज बोलत होते. आपल्याला काय आवडते यापेक्षाही देवाला काय आवडते नाथांना काय आवडेल असेच आचरण अपेक्षित आहे. तळेगाव हे गाव पूर्वीपासून भक्ती साधनेतील गुरुपरंपरा जपणारे आणि समर्पित भक्ती करणारे गाव आहे पंडू काका प्रभुदास महाराज शेषेराव काशिनाथराव पाटील अनंतराव जाधव आणखीन बरीच नावे सांगता येतील की ज्यांनी तळेगाव आणि परिसरात भक्तीचा मळा फुलवला गुरु सेवेचा वसा चालवला त्यांच्यात नम्रता आणि निस्वार्थ भक्तीभाव होता म्हणून आज जुन्या पिढी सह तळेगाव मधील युवक व सर्व महिला पुरुष नाथषष्ठीच्या उत्सवात उत्साहाने सेवेत रुजू झाले आहेत.

5 मार्च पासून श्रीनाथ षष्ठी महोत्सवाच्या भव्य मंडपात ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सकाळी सात वाजता आरंभ होईल या ज्ञानेश्वरी पारायण तळेगावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती पारायणास बसला पाहिजे हाती पडेल ती सेवा करावी मान अपमान याचा विचार न करता आलेल्या प्रत्येक दर्शणार्थी भक्तांची मनोभावे सेवा कराल तर नाथांची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही…….

याचकाची तृप्ती मनोरथ पुरती , पुरोनिया उरती घ्यावयाशी भाग्य हे जयाचे तो घेईल साचे आनंदाने वाचे घेई नाम ,….

हे महत्त्व नाथांच्या सेवेची आहे असे श्री गहिनीनाथ महाराज यांनी स्पष्ट केले तळेगाव गावातील प्रत्येक व्यक्ती लहानथोर सर्वजण तुकाराम बीजेपासून काला होईपर्यंत नाथांच्या दरबारात महाप्रसाद भोजन घ्यावे असे आवाहन निमंत्रण श्री गहिनीनाथ महाराज यांनी उपस्थित भक्त समुदायास दिलेयावेळी ह भ प श्री ज्ञानराज महाराज डॉक्टर प्रकाश महाराज मल्चिमे विठ्ठलराव पाटील किशनराव पाटील अड हनुमंतराव पाटील, बब्रुवाहन पाटील, ज्ञानोबा नाईकवाडे हनुमंत महापुरे अशोकराव सुरवसे बाळासाहेब सुरवसे हनुमंत एकुर्गे एकनाथराव पाटील प्रदीप सुरवसे ज्ञानेश्वर अंगदराव पाटील अविनाश वसंतराव सुरवसे त्रिंबक सुरवसे अंगद एकुरगे मनोहर काळे मडोळाप्पा मंगलगे हेमंत काळे हनुमंत एकुर्गी अशोक किसनराव सुरवसे उमा उमाकांत मंगलगे ज्ञानोबा सुरवसे आणि तरुण वर्ग आवर्जून उपस्थित होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]