23.9 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*तापसी पन्नू बनली स्विस ब्युटीची ब्रॅण्ड अँम्बेसेडर*

*तापसी पन्नू बनली स्विस ब्युटीची ब्रॅण्ड अँम्बेसेडर*

मुंबई, २३ मे २०२३: स्विस ब्युटी या अग्रगण्य मेकअप ब्रॅण्डने त्यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून बॉलिवुड सुपरस्टार तापसी पन्नूची नियुक्ती केली आहे. तापसीचा प्रभाव आणि ब्रॅण्डच्या उच्च-कार्यक्षम मेकअपप्रती कटिबद्धतेसह या सहयोगाचा मानकांना पुनर्परिभाषित करण्याचा, तसेच व्यक्तींना सर्वोत्तम मेकअप निवड करण्यास मदत करण्याचा मनसुबा आहे. हा सहयोग प्रेक्षकांसोबतचे कनेक्शन सखोल करतो, जेथे तापसी व स्विस ब्युटी यांनी सुरुवातीपासून प्रगती केली आहे. सहयोगाने ते व्यक्तींना त्यांचे अद्वितीय सौंदर्य अंगिकारण्यास प्रेरित करतात, ज्यामधून परिवर्तनात्मक चॅप्टर दिसून येतो, जो वास्तविकतेला साजरे करतो आणि त्यांना त्यांच्या मेकअपसाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करतो.

सर्वोत्तम टॅलेंट व अस्सल व्यक्तिमत्त्वासाठी सुप्रसिद्ध तापसी पन्नू देशभरातील लाखो प्रेक्षकांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे. तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि वास्तविक जीवनातील अनुभवांना ख-या स्वरूपात सादर करण्याची क्षमता स्विस ब्युटीच्या मुलभूत मूल्यांशी परिपूर्णपणे संलग्न आहे. या सहयोगाच्या माध्यमातून स्विस ब्युटीचा त्यांचा मेकअप अधिकाधिक व्यक्तींना उपलब्ध करून देण्याचा मनसुबा आहे. तापसीचे अनेक चाहते आहेत, जे ब्रॅण्डच्या ग्राहक समूहाशी संलग्न आहेत. भारतात व्यापक चाहते असण्यासह तापसी पन्नूचा स्विस ब्युटीसोबतचा सहयोग ब्रॅण्डचे प्रभुत्व अधिक प्रबळ करण्याची आणि नवीन मार्ग खुले करण्याची अपेक्षा आहे.

स्विस ब्युटीचे संचालक श्री. अमित व मोहित गोयल म्हणाले, ‘‘तापसीचे स्वावलंबी व्यक्तिमत्त्व स्विस ब्युटीच्या सर्वसमावेशक मेकअप लाइनशी परिपूर्ण संलग्न आहे. ब्रॅण्डचा टिकाऊ व आरामदायी उत्पादनांसह प्रत्येक मेकअप प्रेमीचा आवडता ब्रॅण्ड बनण्याचा मनसुबा आहे. आम्ही उद्योगामध्ये दशकाला साजरे करत असताना आम्हाला विश्वास आहे की, ब्रॅण्डसोबतचा तिचा सहयोग आमच्या ब्रॅण्डला नव्या उंचीवर घेऊन जाईल आणि ग्राहकवर्गामध्ये वाढ होईल.’’

तापसी पन्नू या सहयोगाबाबत म्हणाली, ‘‘ज्या ब्रॅण्ड्सच्या सांगण्यासाठी कथा आहेत ते ब्रॅण्ड्स महत्त्वाचे आहेत. स्विस ब्युटी त्याबाबतीत अग्रस्थानी असून मेकअपला विश्वासार्ह, आरामदायी, पण उच्च कार्यक्षम करण्याच्या प्रबळ मनसुब्यासह सुरुवातीपासून इथवर प्रगती केली आहे. मी नेहमीच किमतीपेक्षा अधिक उपयुक्त ठरणाऱ्या उत्पादनांचा अवलंब केला आहे आणि स्विस ब्युटी या तत्त्वाला सामावून घेते. त्यांची मेकअप श्रेणी विविध निवडी देते, जे तरूणांचे व जवळपास सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

स्विस ब्युटीचा तापसी पन्नूसोबतचा सहयोग सौंदर्य मानक पुनर्परिभाषित करण्याच्या आणि सर्वांसाठी उत्पादने असलेला मेकअप ब्रॅण्ड बनण्याच्या त्यांच्या कटिबद्धतेमधील महत्त्वाचा टप्पा आहे. या सहयोगामध्ये तापसीचे करिष्माई व्यक्तिमत्त्व आणि स्विस ब्युटीची सर्वोत्तमतेप्रती समर्पितता समाविष्ट आहे, ज्यामधून सौंदर्य उद्योगात सकारात्मक परिणाम निर्माण होण्याची खात्री मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]