*तुज सकल चराचर शरण*

0
602

तुज सकल चराचर शरण
आज 4 डिसेंबर .. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी स्वर्गीय यमुना विनायक सावरकर यांची 132 वी जयंती… सौ यमुना विनायक सावरकर.. किती सांगाव व किती लिहावं यांच्याबद्दल …खरं तर खुप लिहिता येईल व खूप सारं शिकता येईल यांच्या जीवनाचा विचार केला तर……….या यमुनाआईंचे असेच…प्रत्यक्ष वडवानला बरोबर संसार त्या करीत होत्या…जी व्यक्ती अहोरात्र राष्ट्रीय कार्य व राष्ट्रीय हीत याचेच सतत चिंतन करीत होती…माझा देश कधी स्वतंत्र होईल? तो स्वतंत्र होण्यासाठी काय क्रांती करावी? ही क्रांती कधी , कुठे केव्हा व किती व्यापक स्वरूपाची असावी ? या क्रांतीकारी योजना कशा गुप्त पद्धतीने अंमलात आणावयाच्या ? याच बाबींचा विचार स्वातंत्र्यवीर सावरकर सतत करत असे…माझे सुख , माझी पत्नी , माझी मुले , माझा संसार,माझी शेतीभाती,माझे उत्पन्न , माझा आनंद, माझे भविष्य या “माझे , मी , मला ” यांचा विचार स्वातंत्र्यवीर सावरकर कधीच करत नव्हते…मी म्हणजेच राष्ट्र व राष्ट्राचे सुख तेच माझे सुख..ही व फक्त हीच भावना ज्यांच्या मनात कायम होती अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी असणं हे फार मोठं व श्रेष्ठ असं व्रत होतं…..माहेरच्या चिपळूणकर ..हे चिपळूणकर जव्हार संस्थांनचे सरदार, सावरकर परिवारापेक्षा सुबत्ता व श्रीमंती अधिकच…मात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांशी विवाह झाल्यावर मात्र या माऊलीच्या नशीबी कष्ट , हालअपेष्टा, अपमान व दारिद्र्य हेच पदरी आलं….आपला पती इतरांपेक्षा वेगळा आहे हे काही वर्षातच त्यांच्या लक्षात आलंच असणार मात्र शेवटी स्त्रीसुलभ भावना यांच्याही मनी असणारच ना….. “कावळ्या- चिमण्यांसारखा संसार तर सगळेच करतात मात्र आपण आपल्या संसारसुखाची आहुती या स्वातंत्र्ययज्ञात देतं आहोत…आपल्या याचं आहुतीने देश पारतंत्र्यातून मुक्त होईल व अनेकांच्या संसारात आनंद पसरेल इतकेच काय भारताच्या प्रत्येक घरातून सोन्याचा धूर निघेल”…असे विचार स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला तुरूंगात भेटायला आलेल्या या आपल्या पत्नीला सांगितले तेव्हा ही माऊली सारं काही शांत व निमुटपणे ऐकत उभी होती….. ..स्वातंत्र्यवीर सावरकर व मोठे बंधू बाबाराव सावरकर या दोन्ही बंधूंना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा झाली….तेव्हा येसूवहिनी व या यमुनाआई दोघींना खुप हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या…स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनला शिक्षणासाठी गेले असता त्यांचा मुलगा प्रभाकर यांस देवाज्ञा झाली…नाशिकच्या सांडव्यावरच्या देवीच्या पायरीवर येसूवहीनी व या आपल्या प्रभाकर या मुलांस घेऊन बसल्या होत्या प्रभाकरचे अंग तापाने एकदम फणफणले

….प्रभाकरची हालचाल एकदम थांबली….काय झालं असेल तेव्हा…पोटचा मुलगा गेला आणि पती परदेशात…भगूरच्या घरावर जप्ती आली तेव्हा पाषाणहृदयी ब्रिटिशांनी भर पावसात या दोघींना वाड्याबाहेर काढले…एका श्रीमंत सरदार घराण्यातील मुलगी रस्त्यावर आली होती.. लिहिण्यासारखं खू़प आहे….स्वातंत्र्यवीर सावरकर कायमच माझी भारतमाता माझी स्वातंत्र्यलक्ष्मी कधी स्वतंत्र होईल? याचाच विचार व कृती करत होते….त्यांनी कधीच या गृहलक्ष्मीच्या आनंदाचा व सौख्याचा विचार केला नाही….तरी ही माऊली कधी रागावली अथवा रूसली नाही …उलट आपल्या पतीपरमेश्वराच्या राष्ट्रीय कार्यात जमेल त्या पद्धतीने सहभागी झाली
शब्द व वेळ कमी पडेल हेच निश्चित……दिवसभर डोक्यात विषय चालू होता….की काय लिहू व कसं मांडू…जसं जमेल तसं लिहिलंय…खरं तर प्रत्येक जयंती/पुण्यतिथी ला लिहिलंच पाहीजे का? आहेत की इतर जण…वाचलं व पाहीलं की इतरांच…पण तरी मेंदू शांत बसू देत नाही..ज्यांनी अपार कष्ट सहन केले व आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं…त्यांना आपल्या शाब्दिक कुसुमांनी आदरांजली वाहायलाच हवी…निदान आपण इतकं तर जरूर करू शकतो….
स्वातंत्र्यवीर सावरकर पत्नी यमुनाआई विनायक सावरकर यांना विनम्र अभिवादन……
भुगूर येथील निवासस्थानी आज त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
**जयंती देशमुख**
(संदर्भ:-“आम्ही तिघी”)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here