औसा – मंत्रालयाच्या सातमजली इमारतीमधील एकही मंत्री अथवा कार्यालय शिल्लक राहिले नसेल कि आमदार अभिमन्यू पवार तिथे गेले नाहीत.अख्खे मंत्रालय त्यांनी पिंजून काढून मतदारसंघात विकास निधी आणला आहे.सरकार नसतानाही कोव्हीडच्या काळात महाराष्ट्रातील सच्चा इमानदार आमदार म्हणून त्यांनी काम केले आहे महाराष्ट्रातील आमदारांना शेतरस्त्यांचे माॅडेल अभिमन्यू पवार यांनी दिले असून ते मत मागायला तुमच्याकडे आले तर मताचे कर्ज तुम्ही त्यांना द्या विकासाच्या रुपाने ते कर्ज तुम्हाला व्याजासह देतील अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
मंगळवारी औसा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आमदार अभिमन्यू पवार ,खासदार सुधाकर शृंगारे ,संजय केणेकर ,संजय कोडगे ,किरण पाटिल ,भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख संतोषअप्पा मुक्ता ,औसा मंडळाचे अध्यक्ष सुनील उटगे ,सभापती चंद्रशेखर सोनवणे ,उपसभापती प्रा भीमाशंकर राचट्टे ,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे ,भाजपचे उपाध्यक्ष किरण उटगे ,ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा सुधीर पोतदार ,संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे ,मौलाना मुफ्ती बिलाल ,कल्पना डांंगे ,अक्रम खान ,आदीसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की पदावर असताना अनेकांना पाहिले असेल पण आमदार नसतानाही मंत्रालयातून समाजासाठी शेवटच्या घटकांच्या कल्याणासाठी काम करणारा सच्चा कार्यकर्ता अभिमन्यू पवार आम्ही पाहिला आहे.त्यांची काम करण्याची तळमळ आम्ही पाहिली आहे कर्ज घेताना बॅकेत जसे दोन जामिनावर लागतात तसे अभिमन्यू पवार यांचे पाहिले सर्वात मोठे जामीनदार देवेंद्र फडणवीस असून दुसरा जामीनदार मी असल्याचे त्यांनी सांगून भाजप च्या पाहिल्या ३२ आमदारांच्या यादीत अभिमन्यू पवार यांचे नाव असून या चार वर्षांच्या काळात विविध योजनेतून मतदारसंघात विकास निधी मंजूर करण्यासाठी त्यांनी संपुर्ण मंत्रालय पिंजून काढले आहे.
………………………….
तुमचा निरोप योग्य ठिकाणी पोहचतो
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मनात काय चाले आहे मला माहीत आहे म्हणताच औशाला लाल दिवा पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली .याला उत्तर देताना तुमचा निरोप मी योग्य ठिकाणी पोहचतो म्हणताच कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.