लातूर —
धवेली (रेणापूर ) येथील जि.प.प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती तृप्ती बबनराव अंदुरे यांना यवतमाळ येथील अग्निपंख शैक्षणिक समूहाच्या वतीने नुकतेच राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक गुणगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यवतमाळ येथे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ डाॅ.ए.ए. नातू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास यवतमाळचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षण उपसंचालक दीपक चवणे ( पुणे ) , नागपूर च्या राज्यस्तरीय विज्ञान शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त संचालक रविंद्र रमतकर, जि.प. प्रा.शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, डायट यवतमाळचे प्राचार्य डाॅ. प्रशांत गावंडे गटशिक्षणाधिकारी वसंत महाले ( मोखाडा ), निवृत्त मुख्याध्यापक नामदेव गोपेवाड, डायटचे डाॅ. रमेश राऊत,नितीन भालचंद्र, बीडीओ प्रकाश नगराळे, ( झरी जायची ) , जयश्री वाघमारे ( महागाव ) , प्रवीण वानखेडे ( उमरखेड ), किशोर रावते ( आर्णी )मारुती मडावी, पांडुरंग खांडरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.