28.6 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeसाहित्य*थोर माध्यमकर्मी , लेखक ,वक्ते डॉ. विश्वास मेहंदळे यांचे दु:खद निधन*

*थोर माध्यमकर्मी , लेखक ,वक्ते डॉ. विश्वास मेहंदळे यांचे दु:खद निधन*

पुणे ; दि.९ ( प्रतिनिधी ) –

आकशवाणीचे वृत्तनिवेदक , दूरदर्शन-टीव्हीचे निर्माते , लेखक , सांस्कृतिक खात्याचे संचालक , पत्रकारिता संशोधक , प्राध्यापक नि फर्डे वक्ते अशा अनेक रूपात सर्व महाराष्ट्रात सदैव संचार नि लेखन करीत राहणारे डॉ. विश्वास मेहंदळे (वय ८२ वर्षे) यांचं निधन झाल्याची बातमी कळाली नि डोळ्यासमोर एक कर्तबगार नि निर्वेर मनाचा जाणता माणूस , चैतन्यमय नि स्नेहमय व्यक्तित्वाचे धनी असं रूप उभं राहिले.

प्रसारमाध्यम क्षेत्रात , अध्यापन क्षेत्राधिकार लेखन क्षेत्रात आपलं “सदा हरितपण “ ( एव्हरेस्ट ग्रीन ) जपणारा रसरशीत ओला माणूस हरपला . लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेवर पीएच. डी . प्रबंध, “भटाचं पोर “ हे आत्मचरित्र , भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , आपले वैज्ञानिक , भेटलेली व भावलेली माणसं अशा विषयांवर त्यांनी पुस्तकं लिहिली. पीरदर्शकता व मनमोकळेपणा हे त्यांचा स्वभाव विशेष होता. माणसं जोडपं नि जपणं यांची मनापासून आवड होती , सर्वथरातील जनसंपर्क , सांस्कृतिक कार्य संचालक म्हणूनही त्यांनी नाट्यसंगीत कलेची मूलत: आवड असल्यानं सुरेख काम केलं .. महाराष्ट्रभर हज़ारों व्याख्यानं दिली तेही एसटीनं प्रवास करून .. वक्तृत्व, माध्यम कर्तृत्व, लेखनधर्म अशा अंगानं सदैव काम करीत राहणारा उर्जावान कर्मयोगी आपल्यात नाहीत .. विनम्र आदरांजली ..,!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]