24.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeसांस्कृतिक*दक्षिणेश्वर श्री औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्या महाआरतीमध्ये ८०० महिलांचा सहभाग*

*दक्षिणेश्वर श्री औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्या महाआरतीमध्ये ८०० महिलांचा सहभाग*

 

 आ. अभिमन्यू पवार दांपत्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चांदीच्या श्रीच्या प्रतिमांचे वितरण 

लातूर : लातूर शहरातील प्रतिष्ठापनेचा व विसर्जनाचा शेवटचा मान असलेल्या  दक्षिणेश्वर श्री औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाच्य्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी संपन्न झालेल्या महाआरती सोहळ्यात ८०० महिला भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या महाआरती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून  औशाचे आमदार अभिमन्यू पवार सपत्नीक उपस्थित होते.

  

                   दक्षिणेश्वर श्री औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळ आपल्या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांमुळे कायम लातूरच्या सांस्कृतिक, सामाजिक  व धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असते. कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च न करता पारंपारिक  पद्धतीने पण अत्यंत गौरवपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा या मंडळाने मागच्या पन्नासहून अधिक वर्षात जोपासण्याचे महत्वपूर्ण कार्य केले आहे.    मागील २८ वर्षापासून या गणेश मंडळामध्ये फायबरची गणेश मूर्ती आहे. या  गणेश मूर्तीवर १६  किलो चांदीचे आभूषण आहेत.. या गणेश मंडळामध्ये मागील अनेक वर्षापासून डीजे लावला जात नाही. गुलाल उधळला जात नाही..इको फ्रेंडली गणेशाची मूर्तीची  स्थापना  करण्यासंदर्भांत  जनजागरण केले जाते. अन्य गणेश मंडळांचे विसर्जन झाल्यानंतर  विसर्जन मार्ग स्वच्छ केल्यानंतरच या गणपतीचे विसर्जन केले जाते.  यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या महाआरती सोहळ्यास या. अभिमन्यू पवार सपत्नीक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांसोबत मंडळाच्या तीन महिला प्रतिनिधींना मान देण्यासाठी चिट्ठ्या काढून तिघींची निवड करण्यात आली. हा मान सुवर्णा  चोळखणे, शैलजा उफाळे व सौ. मनिषाताई  यांना  मिळाला. या तिघींचा पवार दांपत्यांच्या  हस्ते साड्या  व चांदीच्या गणेश प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने महिलांसाठी  आरतीचे ताट सजावट स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये धनश्री विनोद वाकडे व संध्या गणेश धमगुंडे यांनी सन्मान मिळवला.  यावर्षी  गणेश मंडळांने  महिला महारतीला उपस्थित असलेल्या ८००  महिलांना चांदीच्या गणेश प्रतिमेचे वाटप करण्याचं ठरवले होते. त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. उर्वरित महिलांना गणेश विसर्जनानंतर श्रीच्या चांदीच्या मूर्तींच्या प्रतिमांचे वितरण करण्यात येणार आहे. महाआरती सोहळ्यास उपस्थित आ. पवार दांपत्यांचा गणेश मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. 
 याप्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदयकुमार चौंडे, चंद्रशेखर बसपूरे , भीमाशंकर सिद्धेश्वरे , गणेशोत्सव २०२२  चे  मंडळाचे अध्यक्ष विलास गोंदकर, डॉ. संजय वारद ,  रवी समशेट्टे, महेश कोळे, गोविंद झिपरे, रजनी बनभैरू, अश्विनी कनडे , अर्चना हालकुडे , दीपिका कनडे, पल्लवी पाटील, , रुपाली गोंदकर, आदिती व्यास यांसह ८०० महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ————————-  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]