दमदार पाऊस

0
270

औराद  परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस

तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी -आ.निलंगेकर 

लातूर/प्रतिनिधी:रविवारी सायंकाळी औराद शहाजानी व परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस होवून शेकडो नागरिकांचे अतोनात नुकसान झाले.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी,अशा सुचना आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

औराद शहाजानी व परिसरात रविवारी जोरदार पाऊस झाला.ढगफुटी व्हावी असा हा पाऊस होता.या पावसाने घरे,शेती व मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे.वादळी वारे आणि जोरदार पावसाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून नुकतीच पेरणी झालेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे.

पावसाचे वृत्त समजताच आ.निलंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या सुचना केल्या.या पावसाने शेतकरी व नागरिक नागवले गेले असून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत असे त्यांनी सुचवले. उपजिल्हाधिकारी,गटविकास अधिकारी,तहसीलदार यांच्याशीही आ.निलंगेकर यांनी व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला.अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जावे.नुकसानीची पाहणी करावी.त्याचे अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे,असे निर्देश त्यांनी दिले.

बाहेरगावी असतानाही मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आ.निलंगेकर यांनी प्रशासकीय यंत्रणा गतिमान केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here