शाळेतून महैबुब मुनीर पटेल सर्वप्रथम
वडवळ नागनाथ:(प्रतिनिधी ) –– इयत्ता दहावीच्या परिक्षेत येथील विद्यानिकेतन विद्यालयाचा निकाल शंभर टक्के इतका लागला असून, शाळेने या परीक्षेतील निकालाची उज्ज्वल परंपरा याहीवर्षी कायम राखल्याने
दहावी परिक्षेसाठी या शाळेतील सर्वच्या सर्व एकूण २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महेबुब मुनीर पटेल याने ८८ टक्के गुण मिळवून शाळेतुन प्रथम क्रमांक पटकावला. आर्यन अशोक सोरटे याने ८७.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर प्रथमेश परमेश्वर सुर्यवंशी याने ८७.४० टक्के गुण मिळवून तृत्तीय क्रमांक पटकाविला आहे. शाळेतील सहा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सिद्रामप्पा आचवले, उपाध्यक्ष बाबूराव गंदगे, ज्ञानेश्वर बेरकिळे, सचिव प्रभाकर स्वामी यांच्यासह सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक सतीष सांगवे आणि शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.




